Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Three people injured in different accidents in Yawal

यावलमध्ये दुचाकी अपघातात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष सोळुंके गंभीर जखमी,शुक्रवारी दोन अपघातात तीन जण गंभीर

प्रतिनिधी | Update - May 10, 2019, 05:17 PM IST

अँब्यूलन्समुळे जखमींना नेण्यास विलंब झाल्याने जखमींच्या नातलगांनी संताप व्यक्त केला

  • Three people injured in different accidents in Yawal

    यावल- तालुक्यात शुक्रवारी दोन अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष गेंदू सोळुंके (रा.चिंचोली) यांचा समावेश असुन त्यांच्यासह सर्व जखमींवर यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले आहे. रूग्णालयात 108 वाहन असुन त्यावर डॉक्टर नसल्याने भुसावळ येथुन वाहन बोलवण्यात आले त्यात अर्धातास जखमींना नेण्यास विलंब झाल्याने जखमींच्या नातलगांनी संताप व्यक्त केला.


    शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल-सातोद रस्त्यावर वळनाचा अंदाज न आल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली त्यात विनायक नन्नवरे(वय30रा.जळगाव) हा गंभीर जखमी झाला त्यास तात्काळ यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजेला यावलकडून रावेर तालूक्यातील ऐनपूरला लग्न समारंभात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष गेंदा सोळुंके (वय60 रा.चिंचोली) आणि प्रशांत सुरेश सोनवणे (वय34 रा.चुंचाळे) हे दोघे दुचाकीवरून जात होते. दरम्यान सांगवी येथे पुला जवळ अचानक पाण्याचे टँकर रस्त्यावर आल्याने त्या पासुन बचावतांना दुचाकी चालक प्रशांत सोनवणे हे दुचाकीसह थेट पुलाच्या खाली दुचाकी सह कोसळले त्यात सुभाष सोळुंके यांच्या डोक्यास हाताला व पायाला जबर दुखापत झाली तर प्रशांत सोनवणे यांच्या पायाला व छातीला जबर दुखापत झाली त्यांच्यावर येथील ग्रामिण रूग्णालयात डॉ. संतोष सांगोळे, नेपाली भोळे, मंजुषा कोळेकर, संजय जेधे, पिंटू बागुल यांनी प्रथमोपचार केले व त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, सेनेचे शरद कोळी, संतोष धोबी, चिंचोलीचे उपचरपंच आकाश सोळुंके, पप्पु सोळुंके सह अनेकांनी रूग्णालय गाठले होते.

    108 मुळे संताप

    शासना कडून आपत्यकालीन अपघात सेवे करीता 108 सेवा आहे, तेव्हा अपघातानंतर रूग्णालयात 108 वाहन लागुन होते मात्र, त्यावर डॉक्टर नसल्याने भुसावळ येथुन वाहन मांगवावे लागले त्यामुळे भुसावळ हून वाहन यायला अर्धा तास लागला. गेल्या काही दिवसांपासुन हीच अवस्था यावल येथील 108 वाहनाची असून जखमींच्या नातलगांनी घटने नंतर संताप व्यक्त केला आहे.

Trending