आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची सुटका तर लिफ्ट टेक्निशियनचा मृत्यू, मुलुंडमधील दुर्दैवी घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन तासांनंतर अडकलेल्या तिघांची सुटका करण्यात आली

मुंबई- मुलुंडमधील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका करण्यात आली. पण, या घटनेत लिफ्ट टेक्शिनिशयनचा मृत्यू झाला आहे. संजय यादव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुलुंडमधील रिचा टॉवर या इमारतीत सकाळी लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन 13 व्या मजल्यावर तर एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता. यावेळी अचानक लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्टवरील कर्मचारी हा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढले. मात्र लिफ्टच्या वरच्या भागात अडकलेल्या संजय यादव यांचा लिफ्ट आणि भिंतीच्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे.