आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपतीपुळे येथील समुद्रात तिघांचा बुडून मृत्यू, दोघांचे मृतदेह सापडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीपुळे - प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी तिघेजण बुडाले. यात एका महिलेचा समावेश होता. यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. पाण्याच अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत  आहे. तिघेही कसबा, कोल्हापूर येथील राहणारे होते.
 
श्री क्षेत्र गणपतीपुळे हे श्री गणेशाचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रासह देश आणि जगभरात प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येत असतात. येथील मंदिरासमोरील अथांग समुद्र पर्यटकांना आकर्षित करतो. परंतु हा समुद्र धोकादायक आहे. यात आजपर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. 15 ऑगस्ट सह शनिवार आणि रविवार या सुट्ट्या जोडून आल्याने तसेच पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांची गणपतीपुळे येथे गर्दी झाली आहे. शनिवारी सकाळी कोल्हापूर येथून आलेले तिघेजण समुद्रात उतरले होते. मात्र तिघेही बुडाले. त्यामध्ये काजल रोहन मचले (वय 17 वर्षे),  सुभान विशाल मचले (वय 25) आणि उमेश अशोक बागडे (वय 28) यांचा समावेश आहे. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. हे पर्यटक हे कसबा बावडा, कोल्हापूर येथील आहेत. तर त्यांचे मूळ गाव हुबळी, कर्नाटक असल्याची माहिती मिळाली आहे.