आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैस चोरीच्या संशयावरून तिघांचा मारहाणीत मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 छपरा - बिहारच्या सारण जिल्ह्यात शुक्रवारी म्हैस चोरीच्या संशयावरून लोकांनी तिघांना बेदम मारहाण केली. यात तिघांचाही मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाइकांनी म्हैस चोरीचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. बनियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिथौरी गावानजीक हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे. 


शुक्रवारी पहाटे राजू नट (३०), बिदेस नट (३५) आणि नौशाद कुरेशी (४०) यांना लोकांनी पकडले. त्यांचे हात-पाय बांधून त्यांना काठ्यांनी मारहाण सुरू केली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या वेळी गावातील एका जमावाने एका वाहनाचीही तोडफोड केली. या लोकांचा आरोप आहे की, मृत तिघे जण म्हशी चोरून त्या वाहनात घेऊन जाणार होते. 

 

दोन शेळ्या गाडीत...
गावकऱ्यांचा आरोप आहे की, मृत तिघांनी अगोदर दोन शेळ्या गाडीत ठेवल्या. नंतर म्हशी सोडून गाडीत चढवत असताना एका म्हशीने चोराला जखमी केले. या वेळी तो ओरडू लागला आणि गावकऱ्यांना जाग आली. नंतर गावकऱ्यांनी या तिघांना पकडून बेदम मारहाण केली.