Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Three percent suits from the corporation's property tax till December 31

महापालिकेतर्फे मालमत्ता करात ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के सूट

प्रतिनिधी | Update - Dec 20, 2018, 12:23 PM IST

चारही प्रभाग समिती मिळून कराची वसुली ५० टक्केपर्यंत पाेहोचली

 • Three percent suits from the corporation's property tax till December 31

  जळगाव : अार्थिक वर्ष संपायला अाता तीन महिने शिल्लक असल्याने पालिकेने कर वसुलीवर भर दिला अाहे. चालु वर्षाचा भरणा ३१ डिसेंबरपर्यंत केल्यास नागरिकांना ३ टक्के सुट दिली जाणार अाहे; मात्र १ जानेवारीपासून त्याच रकमेवर २ टक्के व्याजाची अाकारणी हाेणार अाहे. नागरिकांनी २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कराचा भरणा ३१ डिसेंबरपूर्वी करून भरण्यात ३ टक्के सूट मिळवावी, असे कळवण्यात अाले अाहे. चारही प्रभाग समिती मिळून कराची वसुली ५० टक्केपर्यंत पाेहचली अाहे. वसुलीचा अाकडा ८० टक्केपर्यंत पाेहचविण्यासाठी पालिका प्रशासनाला जानेवारीपासून कडक धाेरण अवलंबवावे लागणार अाहे.

  भरणा केल्यावर नळ कनेक्शन
  अमृत योजनेंतर्गत नवीन नळ जोडणीचे काम सुरू करण्यात अाले अाहे. यात २०१८-१९ अखेर मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी कराचा भरणा केलेल्या मिळकतधारकांचेच अमृत योजनेंतर्गत नळ संयोजन जोडण्यात येणार आहे. मिळकतधारकांनी सर्व प्रकारच्या मालमत्ता कराचा भरणा करून पावती जमा केल्यानंतर नवीन नळजोडणी करून दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


  १ जानेवारीपासून त्या रकमेवर २ % व्याजाची अाकारणी हाेणार
  सर्वच पदे घरात ठेवल्यावर अामदारांचे समर्थन करणार काेण?


  जळगाव | अामदारांनी अायुक्तांवर केलेले अाराेप अाणि शिवसेनेने अामदारांना दिलेल्या अाव्हानानंतरही भाजपचे नगरसेवक माैन धरून अाहेत. यामागे अामदारांनी सर्वच पदे अापल्याच घरात ठेवली अाहेत. समर्थन करायला इतरांना माेठे करावे लागते असा चिमटा शिवसेनेचे गटनेते अनंत जाेशी यांनी घेतला अाहे. शहरातील अतिक्रमण कारवाईनंतर अामदार सुरेश भाेळेंनी थेट अायुक्तांवर षड‌्यंत्र रचण्याचा अाराेप केला हाेता. त्यानंतर शिवसेनेने अायुक्तांवर अविश्वास अाणण्याचे अाव्हान अामदारांना दिले हाेते. अाठवडाभरात जाेरदार घडामाेडी घडल्यानंतरही भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने अथवा नगरसेवकाने जाहीररीत्या अामदारांची बाजू घेत समर्थनही केले नाही. यासंदर्भात बाेलताना गटनेते जाेशी यांनी अामदारांकडील पदांची यादीच वाचली. अामदार भाेळे हे स्वत: अामदार, भाजपचे महानगराध्यक्ष, जिल्हा बंॅक व दूध फेडरेशनचे संचालक, सीमा भाेळेंकडे महापाैरपद तसेच सिनेट सदस्य अशी सहा पदे घरातच अाहेत. भाेळेंनी या पदांवर अन्य पदाधिकाऱ्यांना संधी दिली असती तर नक्कीच त्यांचे समर्थन करायला पुढे अाले असते. सगळीच पदे घरात ठेवल्यावर त्यांची बाजू काेण घेणार असे भाजपचे कार्यकर्ते बाेलत असल्याचेही जाेशी यांनी सांगितले.


  भूसंपादन प्रकरणासाठी ज्येष्ठ विधिज्ञांशी संपर्क सुरू
  जळगाव | महासभेत गाजलेल्या भूसंपादन प्रकरणाच्या चाैकशीसाठी तसेच सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडण्याकरिता पालिकेकडून ज्येष्ठ विधितज्ञांशी संपर्क सुरू करण्यात अाला अाहे. यात माजी न्यायमूर्तींसह नावाजलेल्या वकिलांचाही समावेश अाहे. येत्या दाेन दिवसांत ठरावावर स्वाक्षरी झाल्यानंतर प्रत्यक्षात समितीकडून कामकाजाला सुरुवात हाेणार असल्याचे नगरसेवक कैलास साेनवणे यांनी सांगितले. शिवाजीनगरातील घरकुलांचे बांधकाम झालेल्या जागेच्या भूसंपादनाचा मुद्दा गेल्या महासभेत गाजला हाेता. यापूर्वीच संपूर्ण माेबदला दिलेला असताना पुन्हा १२ काेटींचा प्रस्ताव अाल्याने कैलास साेनवणेंनी हा मुद्दा चर्चेत अाणला हाेता. यासंदर्भात दाेषींवर कारवाई करावी, मनपातर्फे सर्वाेच्च न्यायालयात पुन्हा पुनर्विलोकन अर्ज दाखल करावा, यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात अाली अाहे. यासंदर्भातील ठराव दाेन दिवसांत हाती पडणार अाहे. पालिकेचा निधी वाचावा, यासाठी पालिकेकडून सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे, निवृत्त न्यायमूर्ती बी. एच. मारलापल्ले, अॅड. हरेन रावल यांच्याशी संपर्क सुरू असल्याचे साेनवणे यांनी सांगितले.

Trending