आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनौ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे तीन मंत्री एका खासगी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकले आहेत. हे तिघेही राज्यमंत्री असून त्यांच्या स्वीय सहायकांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले. अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणे आणि कंत्राट मिळवून देण्यासाठी हे लोक लाच घेताना रंगेहात पकडले गेले असा आरोप आहे. राज्य सरकारने या सर्वच मंत्र्यांना 27 डिसेंबर रोजीच निलंबित केले होते. त्याच दिवशी एफआयआर देखील दाखल करण्यात आला. तसेच सरकारने विशेष तपास समूह नेमून 10 दिवसांत चौकशी अहवाल मागितला होता.
यूपीच्या हजरतगंज पोलिसांनी शुक्रवारी रात्री मागास वर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे स्वीय सहायक ओमप्रकाश कश्यप, उत्खनन मंत्री अर्चना पांडेय यांचे स्वीय सहायक एसपी त्रिपाठी आणि मूलभूत शिक्षण मंत्री संदीप सिंह यांचे स्वीय सहायक संतोष अवस्थी यांना अटक केली. यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केले असता सर्वांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या सर्वच आरोपींना एसआयटीच्या शिफारसींवर अटक करण्यात आली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री योगी...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजीव कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली होती. यात एसटीएफचे पोलिस महानिरीक्षक आणि आयटीचे विशेष सचिव राकेश वर्मा यांचाही समावेश होता. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सर्वच विभाग आणि कार्यालयांना संबोधित केले. तसेच आप-आपल्या विभागांमध्ये भ्रष्टाचार विरोधात जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.