Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Three policemen suspended including a police sub-inspector for death of sarafa busnesman

​सराफाच्या मृत्यूप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचारी निलंबित

दिव्य मराठी | Update - Aug 24, 2018, 01:09 PM IST

श्रीरामपूर येथील गोरख मुंडलिक या सराफ व्यवसायिकाच्या मृत्यूप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना

  • Three policemen suspended including a police sub-inspector for death of sarafa busnesman

    नगर- श्रीरामपूर येथील गोरख मुंडलिक या सराफ व्यवसायिकाच्या मृत्यूप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. पोलिसांच्या छळाला कंटाळून सराफ व्यावसायिकाने विष पिऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सराफ व्यावसायिकांनी केली होती. कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सराफ व्यवसायिकांनी आंदोलन मागे घेतले होते.

    दरम्यान, चौकशीचा अहवाल आल्यानंतर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार जणांच्या निलंबनाचे आदेश काढले. पोलिस उपनिरीक्षक ए. के. आरवडे, कॉन्स्टेबल एस. एस. बोडखे, जी. एस. शेरकर अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

Trending