आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या पेशींना ऑक्सिजनची गरज का लागते, याचा शाेध लावणाऱ्या ३ संशाेधकांना वैद्यकशास्त्राचे नाेबेल पारिताेषिक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टाॅकहाेम - प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या नाेबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा सोमवारपासून करण्यात येईल. यंदा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या विल्यम जी. केलिन ज्युनियर, ग्रेग एल सेमेन्झा व ब्रिटनचे सर पीटर जे. रॅटक्लिफ यांना देण्यात येईल. माणसाच्या पेशींना ऑक्सिजनची गरज का लागते, याचा शाेध या संशोधकांनी लावला. तिन्ही संशोधकांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार गुणसूत्रांच्या कार्यपद्धतीचे संचालन करणाऱ्या पेशींच्या यंत्रणेचा शाेध घेतला. या शोधामुळे अॅनिमिया, कर्करोग, पक्षाघात यासारख्या आजारांवरील उपचारासाठी मदत मिळेल. १४ ऑक्टाेबरला नोबेल पुरस्कारांचे वितरण हाेईल.
 

हा हाेता शाेध : संशोधनाने अॅनिमिया, कर्करोग व पक्षाघात उपचारांसाठी मदत 
तिन्ही संशोधकांनी १९९० पासून सुरू केलेल्या आपल्या संशोधनात शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पेशी आक्सिजन कसा जाळतात व नवीन पेशी तयार हाेण्यासाठी कशी मदत मिळते याचा शाेध लावला. गूणसूत्रांच्या घडामोडी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने अणूमध्ये अशा कोणत्या हालचाली घडतात व वेगवेगळ्या स्तरांवर अाॅक्सिजन वेगवेगळ्या पद्धतीने  एकत्रित हाेताे. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी वा जास्त असल्याचे पेशींना कसे समजते. कमी वा जास्त असल्यास काय करावे लागते. ऑक्सिजनच्या पातळीचा आपल्या सेल्युलर मेटाबाॅलिझम व शारीरिक घडामोडींवर कसा परिणाम हाेताे याचा शाेध त्यांनी घेतला. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर समजणे साेपे हाेणार आहे.
 

नोबेल पुरस्काराचे स्वरूप
साडे चार कोटी रुपये रोख, 23 कॅरेट सोन्याते 200 ग्राम वजनी पदक आणि प्रशस्तीपत्र असे या नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे. पदकाच्या एक बाजुला पुरस्काराचे जन अल्फ्रेड नोबेल यांचे चित्र तसेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजुस यूनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल ऑफ सायंस तथा पुरस्कार प्राप्त व्यक्तीची माहिती लिहिलेली असते.