आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती महिलेसह तीन बहिणींना पोलिसांनी नग्न करून केली बेदम मारहाण, एकीचा पोलिस स्टेशनमध्येच गर्भपात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहटी- आसामच्या दरंग जिल्ह्यात क्रूरकर्मा पोलिसाने तीन सख्ख्या बहिणींना पोलिस स्टेशनमध्ये निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. यापैकी एक महिला गर्भवती होती. पोलिसांच्या मारहाणीनंतर तिचा गर्भपात झाला. तिन्ही बहिणींच्या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या हृदयद्रावक घटनेची दखल घेतली. तसेच चौकशीचे आदेश जारी केले आहेत. सोबतच, या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस अधिकाऱ्यासह एका महिला काँस्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.आसामच्या या घटनेवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तक्रार दाखल करणाऱ्या पीडित महिलांपैकीच एकीने सांगितल्याप्रमाणे, पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी तिला, पतीला आणि तिच्या इतर दोन बहिणींना घरातून अटक केली. यानंतर तिला दरंग जिल्ह्यातील बुरहा पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्या सर्वांना एका महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या पीडित तरुणींच्या भावाने दुसऱ्या धर्माच्या एका महिलेसोबत लग्न केले होते. पीडित तरूणींपैकी एकीने या प्रकरणाची तक्रार दरंग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमृत भुइया यांच्याकडे केली. तिने सांगितले, की 10 सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन इंचार्ज महेंद्र सरमा आणि महिला पोलिस हवालदार बिनिता यांनी पीडितेचा पती, तिला आणि तिच्या इतर दोन्ही बहिणींना नग्न केले. यानंतर बेदम मारहाण केली आणि बंदूकीचा धाक दाखवून अत्याचार केले. गर्भवती असतानाही पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मात्र, त्या महिलांपैकी कुणीही गर्भवती असल्याची माहिती नव्हती असे स्पष्टीकरण दिले आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अहवाल मागवला आहे.