आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत चारमजली इमारत काेसळून पाच जणांचा अंत; मालकाविराेधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील अशाेकविहार भागात बुधवारी सकाळी २० वर्षे जुनी चारमजली इमारत काेसळली. या घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्यात दबून चार मुले व एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. दरम्यान, गतवर्षी या इमारतीसंदर्भात तक्रार करण्यात अाली हाेती. त्यानुसार तीन अाठवड्यांपूर्वीच पालिकेने या इमारतीची पाहणी करून तिला धाेकादायक जाहीर केले हाेते. 


याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे साडेनऊ वाजता ही इमारत अचानक काेसळली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी पाेहाेचले. घटनेवेळी इमारतीत १२ जण हाेते. अग्निशमन व एनडीअारएफच्या दाेन पथकांनी ढिगाऱ्यात दबलेल्यांना बाहेर काढले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला हाेता. त्यात मुन्नी नावाची एक महिला व अाशी (वय ३) व शाैर्य (वय २) या भाऊ-बहिणीसह एकाच कुटुंबातील रजनेश (वय ४) व सुमनेश (वय १२) या दाेन मुलांचा समावेश अाहे. 


जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात अाले. मालक धर्मेंद्रने ही इमारत भाड्याने दिलेली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी त्याच्याविराेधात गुन्हा दाखल केला अाहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत घटनेच्या तपासाचे अादेश दिले अाहेत. नियमाप्रमाणे खुली जागा न ठेवणाऱ्यांवरही कारवाई सुरु होईल. 

बातम्या आणखी आहेत...