आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील भांडणे अंगलट; तीन शिक्षकांचे निलंबन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 धारुर - तालुक्यातील चोरंबा येथे एका शिक्षक पत्नीने  पतीला व एका शिक्षिकेला शाळेत येऊन  विद्यार्थ्यांसमोरच मारहाण केली होती.  संशयातून ही घटना घडली  होती. यानंतर ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून या दोन शिक्षकांसह अन्य एका शिक्षिकेबाबतही तक्रार केली होती. सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी या तीनही शिक्षकांना निलंबित केले.  

 


चोरांबा येथील शाळेत २२ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा  वाजण्याच्या सुमारास येथील आयवळे नामक शिक्षकाची पत्नी व अन्य तिघा जणांनी शाळेत येऊन आयवळेसह शिक्षिकेस विद्यार्थ्यांसमोर मारहाण केली होती. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर  चोरांबा ग्रामस्थांनी बैठक घेऊन कारवाईची मागणी केली होती. २५ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते .

 

 गट शिक्षणाधिकारी गौतम चोपडे, विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, केंद्रप्रमुख विलास मुळे यांनी घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून  लेखी जबाब घेतले होते. चौकशीचा अहवाल सीईअोंकडे गेल्यानंतर   भांडण प्रकरणातील एक शिक्षक, एक शिक्षिका तर अन्य एका शिक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले होेते. शाळेत मारहाण करणे, शालेय शिस्तीचा भंग करणे, शिक्षकी पेशास अशोभनीय वर्तन करणे  असा ठपका ठेवून तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  सोमवारी याबाबत आदेश  काढण्यात आले आहेत .

 

 शिक्षक के .बी. आयवळे यांना निलंबित काळात माजलगाव गट शिक्षणाधिकारी कार्यालय देण्यात आले आहे . शिक्षिका पी .बी. शिंदे यांना निलंबित काळात वडवणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय देण्यात आले आहे . तिसरी  शिक्षिका एस .आर. काळुंखे यांनाही ग्रामस्थांच्या तक्रारीवरून निलंबित करण्यात आले असून त्यांना गट शिक्षणाधिकारी कार्यालय गेवराई देण्यात आले आहे .

बातम्या आणखी आहेत...