आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी महिलेला तोंड दाबुन लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, नंतर अंगावरील दागिणे हिसकावून केला पोबारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- माढ्यात अनेक दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. घराच्या मागील बाजुने आथ प्रवेश करुन घर फोडण्याचे सत्र आता कुठे थांबले असतानाच, चोरट्यांनी महिलेला मारहाण करुन ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


आतापर्यंत झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात माढा पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. 
शहरानजीक असलेल्या माढा शेटफळ मार्गावरील गालिशा बाबा दर्ग्याजवळ रेखा सचिन अवचर राहतात. दरम्यान 
तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण करत तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची दागिने लंपास केले. घटना शुक्रवारी रात्री साडे सातच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी माढा पोलिसांत संबंधित महिलेने फिर्याद दिल्यानुसार तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

घटनेत चोरट्यांनी 20 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. 
रेखा अवचर यांचे तोंड दाबून लाथा बूक्यांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र, कानातील कर्णफूल, पायातील पैंजण असे दागिने काढुन घेतले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे करत आहेत. घटना गंभीर असुन चोरट्यांचा तातडीने शोध लावू. दरम्यान नागरिकांनी देखील सतर्कता दाखवावी आणि आक्षेपार्ह वस्तु-व्यक्ती आढळल्यास पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.