Home | Maharashtra | Vidarva | Akola | Three trains including Maharashtra Express will run through Purna

महाराष्ट्र एक्स्प्रेससह तीन गाड्या धावणार पूर्णा मार्गे

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 12:11 PM IST

भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानकावर तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम असल्याने ८ व ९ सप्टेंबर रोजी विभागातील काही रेल्वे गा

  • Three trains including Maharashtra Express will run through Purna

    अकोला- भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानकावर तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम असल्याने ८ व ९ सप्टेंबर रोजी विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्र एक्सप्रेससह तीन गाड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या गाड्या दोन दिवस पूर्णा मार्गे धावतील.


    भादली रेल्वे स्थानकावर प्री नॉन इंटर लॉकिंग व तिसऱ्या रेल्वे लाइनला जोडण्याचे तसेच भादली रेल्वे स्टेशनच्या यार्ड रिमांडलिंगचे काम करावयाचे असल्याने ८ व ९ सप्टेंबर दरम्यान गाड्याच्या मार्गात बदल करण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही दौंड, अहमदनगर, मनमाड, पुर्णा व अकोला या मार्गे धावेल. तर ९ सप्टेंबर रोजी गाडी क्रमांक ११०४० ही अकोला, पूर्णा, मनमाड, अहमदनगर व दौंड मार्गे धावेल. गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनन्स गोरखपूर काशी एक्स्प्रेस ९ सप्टेंबर रोजी मनमाड, पूर्णा, वरणगाव, दुसरखेडा मार्गे धावेल तर गाडी नंबर १५०१८ गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेस ही ८ सप्टेंबर रोजी दुसखेडा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड मार्गे धावेल. गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस ही ९ सप्टेंबर रोजी गोदरा, नालदा, उज्जैन, भोपाल, इटारसी, नागपूर मार्गे तर ७ सप्टेंबर रोजी गाडी क्रमांक १२८३४ ही नागपूर, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नालंदा, गोदरा मार्गे धावेल. गाडी क्रमांक २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनन्स अलाहाबाद एक्स्प्रेस ही गाडी ९ सप्टेंबर रोजी मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, खंडवा मार्गे धावेल तर गाडी क्रमांक २२१६६ वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेस ही गाडी ८ सप्टेंबर रोजी खंडवा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड मार्गे धावेल, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रीतम राणे यांनी केले आहे.

Trending