टीव्ही / एकाच आठवड्यात तीन टीव्ही कलावंतांना झाला डेंग्यू, तरीही कुणी करत आहे शूटिंग तर कुणाला मिळाली फक्त दोन दिवसांची रजा  

अभिनेत्री ईशा सिंहला तर डेंग्यूसोबतच टायफॉइडदेखील झाला आहे

Sep 21,2019 06:00:48 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : मागील एका आठवड्यात जवळपास तीन प्रसिद्ध टीव्ही कलावंतांना डेंग्यूची लागण झाली आहे. तथापि, तब्येत चांगली नसतानाही यापैकी कुणी शूटिंग करत आहे, तर कुणाला फक्त दोन दिवसांची रजा मिळाली आहे. असे ऐकण्यात आले आहे की, 'इश्क सुभान अल्लाह' मालिकेची प्रमुख अभिनेत्री ईशा सिंह आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कलावंत नियती जोशी व मोहसीन खान डेंग्यूने ग्रस्त आहेत. आपल्याला फक्त डेंग्यूच झालेला नसून टायफॉइडदेखील झालेला आहे हे ईशाला जवळपास चार दिवसांपूर्वीच माहीत झाले आहे. तथापि, तिने अद्याप रजा घेतलेली नाही. ती अजूनही या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान निर्माते सेटवर तिची खूप काळजी घेत आहेत. आपला शॉट दिल्यानंतर संधी मिळताच ईशादेखील आराम करण्यासाठी आपल्या मेकअप रूममध्ये निघून जाते. दुसरीकडे मोहसीन आणि नियतीदेखील डेंग्युमुळे त्रस्त आहेत. मालिकेचे भाग राखीव नसल्याने निर्मात्यांनी त्यांना फक्त दोन दिवसांचीच रजा दिली आहे.

X