आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षीय पतीच्या दीर्घायुष्यासाठी 3 बायकांनी ठेवले करवा चौथचे व्रत; पतीदेव म्हणतात- यामुळे केली 3-3 लग्ने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवागाव- आदिवासी समाजात एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथा आहे. नवागाव परिसरातील एका कुटूंब चर्चेचा विषय ठरत आहे, या कुटूंबात एक कुटूंबप्रमुख आणि त्याच्या तीन बायका राहतात. हे कुटुंब आहे नवागाव येथील, 60 वर्षांचे लालु मईडा आपल्या 3 बायकांसोबत आनंदाने जिवन व्यथित करत आहे. ते सांगतात, मुलाच्या अपेक्षेपोटी मी तीन लग्न केले, तीन बायकांपासून मला 7 मुली आणि 1 मुलगा झाला. त्यापैकी एका मुलाचे आणि 4 मुलींचे लग्न झाले आहे.

 

तिघींनाही एकमेकींपासून काहीच त्रास नाही

लालू सांगतात की, माझे पहिले लग्न मी मोहनखेडा येथील गीतादेवीसोबत केले, तिच्यापासून मला एक मुलगा आणि 3 मुली झाल्या. दुसऱ्या मुलाच्या अपेक्षेपोटी मी कुशलगडयेथील जवाबरोबर लग्न केले. तिला 4 मुली झाल्या. पण मला मुलगा पाहिजे होता म्हणून मी परत कलिंजराजवळच्या गावातील केसरसोबत मी तिसरे लग्न केले. माझ्या या तिन्ही बायका एकमेकिंसोबत बहिणीसारख्या वागतात. शनिवारी करवा चौथच्यावेळी तिघींनी माझ्या दिर्घायुष्यासाठी व्रत केले होते. आमच्या गावात कोणताही कार्यक्रम किंवा लग्न असो सर्वच ठिकाणी त्या सोबतच जातात.
छायांकन- नरेश भावसार

 

बातम्या आणखी आहेत...