आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू; वेकोली कोळसा खाण परिसरातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूर जिल्ह्यात कन्हान येथील वेकोली कोळसा खाण परिसरातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे जमीन खचून ढिगाऱ्यावर बसलेले हे तीन मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कन्हैया रामकेवल हरीजन (वय २५), गंगाप्रसाद गल्हर (वय ४५) व शिवकुमार मनीहारी (वय ३५) ही मृतकांची नावे आहेत. हे तिघेही अवैध कोळसा उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांकडे मजूर म्हणून काम करीत होते, असे सांगण्यात येते. 


कन्हान भागात कोळसा खाणी आहेत. अनेक अनेक कोळसा खाणी अवैध असून तिथून कोळसा आणि माती काढण्याचे काम सुरू असते. शुक्रवारी देखील जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसून कोळसा शोधण्याचे काम अवैधरित्या सुरू होते. यावेळी मातीच्या ढिगाऱ्यावर विश्रांती घेत तिघेही मजूर बसले होते. 


पावसाच्या पाण्यामुळे जमीन भूसभूशीत झाली असल्याने खचली आणि मातीच्या ढिगाऱ्यावर बसलेले तिघेही जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.