आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांच्या चिमुरडीवर एवढे अत्याचार, डॉक्टर म्हणाले-जखमा एवढ्या आहेत की, मोजणेही शक्य नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - शहरातील पांडेसरा भागात मंगळवारी एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह झाडांमध्ये आढळून आला. पोलिसांनी म्हटले की चिमुरडीबरोबर रेप झालेला नाही. तर पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर म्हणाले की, शरिरावर एवढ्या जखमा आहेत की, त्या मोजता येणेही शक्य नाही. मुलीचे डोके, डोळे, गाल, हात, पोटापासून ते पायापर्यंत 40 हून अधिक कोल जखमा आहेत. डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने तिचे ब्रेन हॅमरेज झाले. 

 

मृतदेहाची ओळख पटली नाही 
मुलगी नेमकी कोण आहे हे अद्याप समजलेले नाही. ज्याठिकाणी मृतदेह सापडला त्यापासून जवळपास 80 मीटर अंतरावर दोन दिवसांपूर्वी काही लोकांनी झोुड्या बांधल्या आहेत. 100 मीटर अंतरावर लाकडाचे कारखानेही आहेत. क्राइम ब्रँचने तपासासाठी 7 पथके तैनात केली आहेत. मुलीचे पोस्टर अनेक ठिकाणी लावले आहेत. 


अशी मिळाली माहिती 
पोलिसांना मंगळवारी कोणीतरी फोनवर झुडपांत मुलीचा मृतदेह असल्याचे सांगितले. पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले. ही मुलगी मध्यमर्गीय कुटुंबातील असल्याचे तिच्या पेहरावावरून स्पष्ट होत होते. प्राथमिक तपासात मुलीच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण आढळले. पोलिसांना वाटले की, कोणीतही मुलीचा गळा दाबला असावा. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्यावर वार केल्याने तिची हत्या झाल्याचे समोर आले. 

बातम्या आणखी आहेत...