आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदनांमुंळे तडफडणाऱ्या चिमुरडीवर उपचारासाठी डॉक्टरच आले नाहीत, नर्स म्हणाली तोंडावर रुमाल दाबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - सरकारी रुग्णआलयात रुग्णांना लहान-सहान आजारांवर उपचारासाठीही मोठा त्रास सहन करावा लागतो. शनिवारी त्याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. ट्रॉमा सेंटरमध्ये मेडिको लीगल केस (एमएलसी) च्या औपचारिकतेसाठी एका तीन वर्षीय चिमुरडीला उपचारासाठी अनेक तास वाट पाहावी लागली. पडल्यामुळे या चिमुरडीच्या तोंडाला जखम झाली होती आण त्यामुळे तिचा ओठ फाटला होता. वडिलांनी उपचारासाठी तिला सरकारी रुग्णालयात आणले. पण अपघाताचे प्रकरण असल्याटे सांगत डॉक्टरांनी एमएलसी गरजेची असल्याचे म्हटले. ज्या डॉक्टरकडून एमएलसी करायची होती ते डॉक्टर रेप केसमध्ये पकडल्या गेलेल्या डॉ. प्रफुल्ल दोषींच्या प्रकरणात व्यस्त होते. त्यामुळे दोन तास चिमुरडीची एमएलसी दाखल झाली नाही. एमएलसी दाखल झाल्यानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करणारे डॉक्टरच नव्हते. 


वडील विनवण्या करत राहिले...
डॉक्टरांना बोलावण्यासाठी वॉर्डमध्ये अनेकवेळा फोन करण्यात आला. पण डॉक्टर आले नाही. चिमुरडीचे वडील उपचारांसाठी डॉक्टर आणि नर्सना विनंती करत राहिले, पण रुग्णालयाच्या बेजबाबदारपणा आणि कायदेशीर गुंत्यामुळे चार तास चिमुरडीवर उपचार होऊ सकले नाही. 


नेमके काय घडले..
योगेश रात्री 11 च्या सुमारास चिमुरडीला घेऊन सूरतच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आले होते. पडल्यामुळे चिमुरडीचा ओठ फाटला होता. केस पेपर काढून एमएलसी दाखल केल्यानंतर त्यांना सीएमओ चेंबरमध्ये जायचे होते. पण त्याचवेळी रेप केसमधील डॉ. प्रफुल्ल दोषी यांची मेडिकल टेस्ट सुरू होती. त्याला दोन तास लागले त्यानंतर एमएलसी करून ईएनटी विभागाकडे रेफर करण्यात आले. 


नर्स म्हणाली रुमालाने तोंड दाबा 
मुलगी उपचारासाठी आली तेव्हा तिच्या तोंडातून खूप रक्त वाहत होते. वेदनांमुळे ती प्रचंड रडत होती. वडिलांनी नर्सला म्हटले मुलगी खूपर रडतेय काहीतरी औषध द्या. नर्सने उपचार किंवा औषधांऐवजी एक कपडा दिला आणि म्हटले हा तोंडावर दाबा म्हणजे रक्त येणेही बंद होईल आणि ती रडणारही नाही. नाइलाजाने वडिल वारंवार तिचे तोंड दाबत होते आणि नर्सकडे विनवण्या करत होते. ईएनटी विभागाच्या डॉक्टरला बोलावण्यासाठी ट्रॉमा सेंटरमधून वॉर्डात पाच वेळा फोन केला पण डॉक्टर आले नाही. या सर्वात रात्री अडीच वाजले, त्यानंतर या चिमुरडीला वॉर्डात नेण्यात आले. त्यातही सोबत कोणीही कर्मचारी नसल्याने वॉर्ड शोधायलाच चिमुरडीच्या वडिलांना अर्धा तास लागला. ट्रॉमा सेंटरपासून हा वॉर्ड जवळपास अर्धा किमी अंतरावर होता. 

 
एमएलसी करणे गरजेचे 
कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली तरी एमएलसी करणे गरजेचे असते. घरात खेळताना, चालताना, शाळेत कधीही जखम झाली तरी एमएलसी करणे गरजेचे असते.  

 

 

बातम्या आणखी आहेत...