आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three Year Old Girl Raped Killed And Thrown To Rot, Body Found After 4 Days In Mp

Shameful: 3 वर्षांच्या मुलीवर रेप, एक हात गायब; 4 दिवसांनंतर सापडला विक्षिप्त मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात एका अवघ्या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह अतिशय विक्षिप्त अवस्थेत रविवारी सापडला आहे. गटाराच्या शेजारी सापडलेल्या या मृतदेहाचे डावे हात गायब होते. तिचे मृतदेह अक्षरशः कीड्या मुंग्यांनी खाल्ले होते. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावण्याचे निशाण होते. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी त्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी तिचे आई-वडील कामाला गेले असताना आजी-आजोबा व्हरांड्यात बसले होते. तर ही चिमुरडी घराबाहेर खेळत होते. 


एक किमी दूर सापडला विक्षिप्त मृतदेह...
> पोलिस अधीक्षक अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुकली बुधवारीच आपल्या आजी-आजोबांच्या नजरेसमोर खेळत होती. त्याच दरम्यान लघवीसाठी ती एका नाल्याजवळ गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. यानंतर आजी-आजोबांनी आवाज दिले आणि शोध सुरू केला. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना याची माहिती दिली आणि त्या सर्वांनी मिळून पोलिसांत मुलगी बेपत्ता तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी स्निफर डॉग पथकाचीही मदत घेतली होती. यानंतर शनिवारी तिचा मृतदेह घरापासून एक किमी दूर अतिशय विक्षिप्त अवस्थेत सापडला.
> त्या मुलीवर बलात्कार झाला असे शवविच्छेदनाच्या अहवालात समोर आले आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तिचे मृतदेह कीडे मुंग्यांनी खाल्ले होते. तसेच एक हात सुद्धा गायब होता. ठिक-ठिकाणी चावा घेतल्याच्या खुणा सुद्धा सापडल्या आहेत. तपासातून स्पष्ट झाले की तिच्यावर बलात्कार झाला. यानंतर तिचा खून करून फेकून देण्यात आले. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषी नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिस सध्या तिच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...