आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू, गेवराई राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई- राष्ट्रीय महामार्ग-61 वर वाहतूक पोलिस कार्यालयाजवळील तळेवाडी फाटा येथे आज(20 जुलै) सकाळी व्यायाम करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तुकाराम विठ्ठल यमगर(वय17), अभिषेक भगवान जाधव(वय15) आणि सुनील प्रकाश थोटे(वय17) अशी मृतांची नावे आहेत. 

तिघे रोज प्रमाणे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गावापासून दिड किमी अंतरावर असलेल्या गढी माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर गेले. यावेळी महामार्गाच्या बाजुला व्यायाम करताना अचानक गढी माजलगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिला. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना इतर काही व्यायाम करण्यासाठी आलेल्या गावातील तरुणांनी  पोलिसांच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. 

रुग्णालयात आणल्यावर सुनील थोटे यास डॉक्टरांनी मृत घोषित केले तर तुकाराम यमगर आणि अभिषेक जाधव यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. हे तिघे विद्यार्थी तळेवाडी येथील रहिवासी आहेत तर जय भवानी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. सर्व सामान्य परिस्थितीतील असून भविष्यात या विद्यार्थ्यांचे पोलिस भरतीसाठीचे नियोजन होते. दरम्यान या घटनेने तळेवाडी गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान धडक दिलेले अज्ञात वाहन माजलगावच्या दिशेने पसार झाले असून, गढी येथील ट्रॅफिक पोलिसांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आहे.