Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | throat sore and infection information in Marathi

घशात खरखर होण्याची ही 3 कारणे तर नाहीत ना? 

हेल्थ डेस्क | Update - Feb 08, 2019, 12:42 PM IST

पोटातील अॅसिड किंवा पित्त जेव्हा अन्ननलिकेत येतो. तेव्हा नलिकेच्या आत जळजळ होते. कित्येकदा हे अॅसिड घशापर्यंत पोहोचते जे

 • throat sore and infection information in Marathi

  जर तुम्हाला सतत घशात खरखर होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घेऊया याची काही कारणे.


  1. छातीत जळजळ
  पोटातील अॅसिड किंवा पित्त जेव्हा अन्ननलिकेत येतो. तेव्हा नलिकेच्या आत जळजळ होते. कित्येकदा हे अॅसिड घशापर्यंत पोहोचते जे घशातील खरखर, जुना खोकला किंवा घसा बसण्याचे कारण होऊ शकते.


  2. व्हायरल इन्फेक्शन
  यामुळे खोकला, नाकामध्ये खाज येणे, मुलांमध्ये अतिसार आणि घसा बसण्यासोबतच खरखर होते. व्हायरल इन्फेक्शनसाठी डॉक्टरांनी दिलेली औषध घेतल्यास आराम हाेतो.


  3. घशाला सूज येणे
  घशामध्ये सूज येणे जसे अॅसोफॅगिटिसमुळेही घशात खरखर होऊ शकते. यामुळे तुम्हाला गिळतांना त्रासही होऊ शकतो. जर आठ दिवसांपेक्षा जास्त हा त्रास असेल तर डॉक्टरांकडे जावे.


  असा मिळेल आराम
  घशात खरखर होत असेल तर गुळण्या केल्यास फायदा होता. काेमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका आणि दिवसभरात तीन-चार वेळा गुळण्या करा. जास्त प्रमाणात गरम द्रवपदार्थ घ्या जसे मध टाकून चहा, गरम सूप घशाच्या खरखरीपासून आराम देतो. यापासून आराम मिळण्यासाठी अद्रकाचा रस फायदेशीर होऊ शकतो. अद्रक गरम असल्यामुळे घशाची खरखर दूर करण्यास मदत होते.

Trending