आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Throne Made From A Million Dollar Notes The Purpose Of It Is 'people Should Sit On It And Think About Earning'

एक लाख डॉलरच्या नोटांपासून बनवले सिंहासन, उद्देश - 'लोकांनी यावर बसावे आणि पैसे कमवण्याचा विचार करावा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोच्या एका आर्ट म्यूझिअममाधेर 2.5 इंच बुलेट प्रूफ ग्लासचे सिंहासन ठेवले गेले आहे. यामध्ये 7 कोटी (एक लाख डॉलर) रुपयांपेक्षा जास्त कॅश आहे. सिंहासनावर सामान्य लोकांना बसण्यासाठी 29 नोव्हेंबरपासून आमंत्रित केले गेले आहे.  


सिंहासनाचे नाव एक्स 10 मनी थ्रोन ठेवले गेले आहे. हे रशियन पॉप कलाकार अलेक्सी सर्गीयेंको याने इगोर राइबाकोव
यांच्या साहाय्याने बनवले आहे. सिंहासन बनवण्याचा आणि यावर लोकांना बसू देण्याचा उद्देश पैशांची ताकद
अनुभवण्याचा आणि आणि तो कमावण्यासाठी प्रेरित करणे आहे. 

सिंहासनावर बसावे आणि लोकांनी श्रीमंत होण्याचा विचार करावा... 


रशियन पॉप कलाकार एलेक्सी सर्जियेंको म्हणाला, ‘‘हे सिंहासन त्या लोकांना प्रेरणा देईल, जे पैशांची ताकद अनुभवतात आणि नेहमी पैसे कमावण्याचा विचार करतात. मी आठ वर्षांच्या वयापासून आर्ट प्रोजेक्ट तयार करत आहे. त्यातील अनेकांचा लोकांवर प्रभाव आहे आणि काही उपयोगीदेखील आहेत. हे सिंहासन यासाठी उपयोगी आहे कारण माझी इच्छा आहे की, लोकांनी पैशांबद्दल बोलावे. त्याबद्दल विचार करावा आणि अधिक कमाई करावी. जेणेकरून आपला देश आणखी धनाढ्य बनावा आणि लोक अजून श्रीमंत व्हावे. 

चर्चेत होते सर्जियेंको आणि रयबकोव...  


2012 मध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना समर्पित चित्रांची साखळी बनावल्यानंतर अलेक्सी सर्गीयेंको चर्चेत आले होते. तर इगोर राइबाकोव टेक्नोनिकोल कॉर्पोरेशनचा सह-मालक आणि राइबाकोव फंडचा सह-संस्थापक आहे. इगोरला 2018 मध्ये 1.2 अरब डॉलरच्या संपत्तीसोबत जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत जागा दिली गेली होती. 

बातम्या आणखी आहेत...