आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोबत नोकरी करताना झाले होते प्रेम, लिव्ह इनमध्येही राहिले; पण अचानक गर्लफ्रेंडवर फेकले टॉयलेट क्लिनर, कारण जाणून बसेल धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीच्या आंबेडकर नगर भागात एका 22 वर्षीय युवतीवर टॉयलेट क्लिनर फेकण्याची घटना घडली. यानंतर हल्लेखोरांनी तिला 'ही तर फक्त झलक आहे, जर केस परत नाही घेतलीस तर चेहऱ्यावर अॅसिड फेकणार' असल्याची धमकी दिली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांना घटनास्थळावर टायलेट क्लिनरची रिकामी बाटली आणि काही पातळ पदार्ध सांडलेला मिळाला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. 


काही दिवसांपू्र्वी एका युवकावर दाखल केला होता गुन्हा, त्याच्यावरच आहे संशय 

पोलिसांच्या मते, पीडित युवती आपल्या परिवारासह शहरातील दक्षिणपुरी भागात राहते. सुरुवातीला ती एक मोबाइल दुकानात काम करत होती. तेथेच तिची एका मुलासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर  दोघांनीही कालकाजी भागात लिव्ह इन मध्ये राहण्यास सुरुवात केली होती. दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध देखील बनले होते. पण युवकाने लग्नास  नकार दिला. यानंतर पीडिताने 10 जानेवारी रोजी कालकाजी पोलिस ठाण्यात युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. 


सीसीटीव्ही फुटेच तपासत आहेत पोलिस
गुरुवारी दुपारच्या सुमारास युवती स्कूटीवर कुठेतरी जात होती. तेवढ्यात दक्षिणपुरी भागातील एका सरकारी शाळेजवळ दुचाकीस्वारांनी तिचा रस्ता अडवला. तिने आरिफ ऊर्फ आसिफ भाई विरोधातील दुष्कर्मची केस परत घेतली नाही तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. त्यांनी आपल्यासोबत कोणतरी बाटली घेऊन आले होते. परताना ते म्हणाले की, हा तर फक्त ट्रेलर आहे, जर तक्रार परत घेतली नाही तर चेहऱ्यावर अॅसिड फेकण्यात येईल. घटनास्थळी तपास करताना स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले की, त्या युवकांनी युवतीसोबत काही वेळ बातचीत केल्यानंतर तो पदार्थ रस्त्यावर टाकला होता. पण पीडित तरुणीने मात्र तो पदार्थ स्वतःवर फेकल्याचे पोलिसांना सांगितले. युवतीने स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे.  सध्या पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या तपासत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...