आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्बानीसाठी बकरा विक्रीला नेला, अचानक कुत्र्यासारखा वागू लागल्याने 10 फूट दूर जाऊन उभा राहिला मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - यूपीच्या कानपूरमध्ये फसवणुकीचे एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. बकरे विक्रीसाठी नेलेल्या एका व्यक्तीला कुत्र्याची दोरी हातात देऊन भामटा रफूचक्कर झाला. बकऱ्यांच्या झुंडीत कुत्र्यासारखी हरकत पाहून पाहून घाबरलेला मालक 10 फूट दूर जाऊन उभा राहिला. या झुंडीतून भुंकण्याचा आवाज येत होता. निरखून पाहिल्यावर कळले की, त्यांची फसवणूक झालेली आहे.

 

- चकेरी परिसरातील जाजमऊ चुंगी बाजारात ईद-उल-जुहाच्या निमित्त बकऱ्यांचा बाजार भरतो.
- लांबून-लांबून गावकरी बकरे विक्रीसाठी बाजारात आणतात. सोमवारी अशरफ अर्धा डझन बकरे सोबत घेऊन बाजारात आले होते.
- बाजारात विक्री आणि खरेदी करणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. याचाच फायदा उचलत एका भामट्याने कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला बाजारात आणले होते.

 

मग बकऱ्याच्या दोरीच्या जागी हातात दिली कुत्र्याची दोरी
- अशरफ अर्धा डझन बकऱ्यांच्या दोरी हातात घेऊन ग्राहकांशी बोलत होते. तेवढ्यात बकरा खरेदी करण्याच्या बहाण्याने एक जण त्यांच्याशी भावताव करू लागला.
- यानंतर भामटा अशरफ यांच्या हातातून दोरी घेऊन बकरे पाहू लागला. जाताना या भामट्याने मोठ्या शिताफीने अशरफ यांच्या हातात बकऱ्याऐवजी कुत्र्याची दोरी दिली आणि चलाखीने अशरफ यांचा बकरा पळवून नेला.

 

भुंकू लागल्याने आली जाग
- अशरफ यांना या फसवणुकीची झाली, पण खूप उशीर झाला होता. बकऱ्यांच्या झुंडीतून अचानक कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्यावर ते चकितच झाले. त्यांना आधी वाटले कुठून तरी कुत्रा भुंकत असेल. परंतु त्यांनी नीट निरखून आपले अर्धा डझन बकरे पाहिले, तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसला.
- मग अशरफ त्या बाजारात डोके पकडून बसले. एवढ्या मोठ्या बाजाराच्या गर्दीत ते भामट्याचा शोध घेत होते, परंतु तो आढळला नाही. शेवटी थकून त्यांनी पोलिसांत याची तक्रार दाखल केली.
- इंस्पेक्टर अजय सेठ म्हणाले, बकऱ्याऐवजी कुत्र्याची दोरी हातात देऊन अज्ञाताने फसवणूक केल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...