आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Thugs of Hindostan: चर्चा आहे... 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नंतर अभिनयातून ब्रेक घेणार आमिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नकारात्मक प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावर होत असलेली थट्टा पाहून आमिरने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'गजनी', 'थ्री इडियट्स' पासून ते 'दंगल' पर्यंत आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. त्यामुळे या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. मात्र त्याचा नुकताच रिलीज झालेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' जादू दाखवू शकला नाही. तथापि, चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र समीक्षक आणि नकारात्मक प्रतिक्रियामुळे हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय आमिरच्या मित्रांनीदेखील त्याला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमिरला सुरुवातीपासूनच चित्रपटात काहीतरी चूक असल्याचे कळले होते, त्यामुळेच त्याने मोठ्या पातळीवर चित्रपटाचे प्रमोशन केले नसल्याची चर्चा अाहे. आमिर यामुळे नाराज झाला आहे आणि तो अभिनयातून ब्रेक घेऊ शकतो, असे ऐकिवात अाहे. आता तो निर्मितीवर लक्ष देणार आहे. तो लवकरच आपल्या 'महाभारत' चित्रपटावर काम सुरू करणार असल्याची चर्चा आहे.  'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ने तीन दिवसात 101.75 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी 50.75, दुसऱ्या दिवशी 28.25 आणि तिसऱ्या दिवशी 22.75ची कमाई केली. 

बातम्या आणखी आहेत...