Home | News | Thugs Of Hindostan Day 2 Collection

दूस-या दिवशी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां'च्या कमाईत झाली प्रचंड घसरण, फेस्टिव्ह सीजनचा फायदा मिळूनही अपेक्षित यश नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 01:06 PM IST

अमिताभ-आमिरची खरी परिक्षा सोमवारीच होईल

 • Thugs Of Hindostan Day 2 Collection

  मुंबई. अमिताभ बच्चन आणि आमिर खान स्टारर 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'च्या कमाईमध्ये दूस-या दिवशी प्रचंड घसरण झाली. बॉक्सऑफिसवर पहिल्या दिवशी जवळपास 52 कोटी कमावणा-या या चित्रपटाने दूस-या दिवशी फक्त 27-29 कोटींची कमाई केली. म्हणजे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पहिल्या दिवसाच्या तुलनेत जवळपास 44-48 कोटींची घसरण झाली आहे. हा एक मोठा आकडा आहे. चित्रपटाला अडव्हान्स बुकिंगचा फायदा झाला हे यावरुन स्पष्ट दिसते. यासोबतच आमिर आणि अमिताभ यांच्यासारख्या मोठ्या नावामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गेले.

  निगेटिव्ह माउथ पब्लिसिटीचा प्रभाव दिसला?
  - 8 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज झाला. समिक्षकांनी चित्रपटाला चांगला रिव्ह्यूव्ह दिला नाही. तर फर्स्ड डे ऑडियन्सनेही चित्रपटाची निंदा केली. कदाचित याच निगेटिव्ह माउथ पब्लिसिटीच्या प्रभावामुळे चित्रपट जास्त कमाई करु शकला नाही. अजूनही चित्रपटाला अडव्हान्स बुकिंग आणि फेस्टिव्ह सीजनचा फायदा मिळतोय. वीकेंडपर्यंत चित्रपट सहज 100 कोटींचा आकडा ओलांडू शकतो. चित्रपटाची खरी परिक्षा सोमवारी सुरु होणार आहे.

  रिलीजसोबत चित्रपटाचे चार रेकॉर्ड
  रेकॉर्ड नंबर 1

  पहिला रेकॉर्ड म्हणजे रिलीजच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाचे 2 लाख टिकीट अडव्हांसमध्ये बुक होते. अडव्हांस बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने रेकॉर्ड बनवला आहे.

  रेकॉर्ड नंबर 2
  चित्रपटाचे सॅटेलाइट आणि डिजिटल राइट्स रिलीजपुर्वीच 150 कोटींमध्ये विकले गेले होते. यापुर्वी सलमानच्या 'रेस 3' चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स 130 कोटींमध्ये विकले होते. तर 'बाहुबली 2'(हिंदी व्हर्जन)चे सॅटेलाइट राइट्स जवळपास 51 कोटींमध्ये विकले गेले होते.

  रेकॉर्ड नंबर 3
  चित्रपटाला जगभरात 7000 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आले आहे. यापुर्वी 'बाहुबली 2' चित्रपट जगभरात 6500 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. तर रणबीर कपूरचा 'संजू' चित्रपट 5300 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता.

  रेकॉर्ड नंबर 4
  'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' चित्रपटाचे बजेट जवळपास 300 कोटी आहे. 'बाहुबली 2'चे बजेट जवळपास 150 कोटी आणि 'पद्मावत'चे बजेट जवळपास 215 कोटी आहे. 'ठग्ज'पेक्षा जास्त बजेट आता रजनीकांत आणि अक्षयच्या '2.0' या आगामी चित्रपटाचे आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.

  पहिल्या दिवसाच्या कमाईने आनंदी आहे आमिर
  आमिर पहिल्या दिवसाच्या कमाईने आनंदी आहे, तो म्हणाला - "ठग्जच्या फर्स्ट डे कलेक्शनविषयी माहिती मिळाले. प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे." आमिर म्हणाला - 'या चित्रपटात काम करणे खुप मजेदार होते, आमच्या टीमने खुप चांगले काम केले. आम्ही खुप मेहनतीने चित्रपट बनवला आहे. माझ्यासाठी या चित्रपटाचा प्रवास नेहमी आठवणीत राहिल. माझ्या व्यतिरिक्त सर्वांनीच चांगले काम केले, मी या टीमचा भाग होतो, यामुळे मी खुप आनंदी आहे.' आमिर म्हणाला "चित्रपटाला किती यश मिळेल मला माहिती नाही, पण चित्रपटाचे भविष्य बाजूला ठेवून मी या दोन वर्षांसाठी सर्वांचे आभार मानतो." चित्रपटाचे डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य आहे, त्यांनी आमिर आणि कतरिनासोबत 'धूम 3' चित्रपट बनवला होता.

Trending