Home | News | Thugs of hindostan movie leaked online but after Release its set 4 New Record

आमिर-अमिताभ यांच्या 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'ची प्रत्येक ठिकाणी उडवली जातेय खिल्ली, तरीही रिलीज होताच बनवले हे 4 रेकॉर्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 03:16 PM IST

प्रेक्षकांची नापसंती, समिक्षकांचा निगेटिव्ह प्रतिसाद, यासोबतच अजून एका मोठ्या संकटाचा सामना करतोय चित्रपट

 • Thugs of hindostan movie leaked online but after Release its set 4 New Record

  मुंबई. आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' चित्रपटावर प्रेक्षकांचा राग आहे. तसेच समिक्षकांनीही चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू दिले आहे. चित्रपटाच्या मेकर्सला हे तर टेंशन आहेच. पण यासोबतच अजून त्यांचे टेंशन वाढले आहे. रिपोर्ट्सनुसार, रिलीजच्या काही तासांनंतरच 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' तामिळ रॉकर्स वेबसाइटवर लीक झाला आहे. तामिळ रॉकर्स वेबसाइट चित्रपटाच्या पायरेटेड व्हर्जनसाठी ओळखली जाते. चित्रपट रिलीजनंतर लीक झाल्याची ही पहिली घटना नाही. यापुर्वी शाहिद कपूरचा 'उडता पंजाब,' सलमान खानचा 'रेस 3' आणि नवाजुद्दीनचा 'मांझी : द माउंटेन मैनी' ही लीक झाला आहे. यामुळे चित्रपटाच्या मेकर्सला मोठे नुकसान झाले आहे.


  रिलीज होताच बनवले 4 नवीन रेकॉर्ड
  'ठग्ज ऑफ हिंदोस्तां'ला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून चांगला रिव्ह्यू मिळाला नाही. पण तरीही चित्रपटाने रिलीज होताच 4 नवीन रेकॉर्ड बनवले आहेत.


  रेकॉर्ड नंबर 1
  पहिला रेकॉर्ड म्हणजे रिलीजच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाचे 2 लाख टिकीट अडव्हांसमध्ये बुक होते. अडव्हांस बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने रेकॉर्ड बनवला आहे.

  रेकॉर्ड नंबर 2
  चित्रपटाचे सॅटेलाइट आणि डिजिटल राइट्स रिलीजपुर्वीच 150 कोटींमध्ये विकले गेले होते. यापुर्वी सलमानच्या 'रेस 3' चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स 130 कोटींमध्ये विकले होते. तर 'बाहुबली 2'(हिंदी व्हर्जन)चे सॅटेलाइट राइट्स जवळपास 51 कोटींमध्ये विकले गेले होते.

  रेकॉर्ड नंबर 3
  चित्रपटाला जगभरात 7000 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आले आहे. यापुर्वी 'बाहुबली 2' चित्रपट जगभरात 6500 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. तर रणबीर कपूरचा 'संजू' चित्रपट 5300 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता.

  रेकॉर्ड नंबर 4
  'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' चित्रपटाचे बजेट जवळपास 300 कोटी आहे. 'बाहुबली 2'चे बजेट जवळपास 150 कोटी आणि 'पद्मावत'चे बजेट जवळपास 215 कोटी आहे. 'ठग्ज'पेक्षा जास्त बजेट आता रजनीकांत आणि अक्षयच्या '2.0' या आगामी चित्रपटाचे आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.

Trending