Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Jan 10, 2019, 12:00 AM IST

गुरुवार राशिफळ : आजची ग्रहस्थिती काही लोकांसाठी ठीक नाही कारण आज व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे, या 5 राशीच्या ल

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  गुरुवार, 10 जानेवारीला शततारका नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  मेष : आज राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित धनवृध्दी करेल. कार्यक्षेत्रातील अनुकूल घटनांनी उत्साह वाढेल. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. शुभ रंग : निळा | अंक : ५

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  वृषभ : आज रिकाम्या गप्पा परवडणार नाहीत. नोकरदारांना जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. काही  कारणाने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शुभ रंग : मरून | अंक : ९

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  मिथुन : नोकरी व्यवसायात आज काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. अधिकारी वर्गाचे मूड सांभाळावे लागतील. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची ओढ लागेल.  शुभ रंग : पिवळा | अंक : ८

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  कर्क : आज दैनंदीन कामात अडथळे येतील. कार्यक्षेत्रात विरोधक मानसिक संतुलन बिघडवू शकतात. एखाद्या प्रसंगी अहंकार दुखावला जाऊ शकतो.  शुभ रंग : क्रिम | अंक : ३

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  सिंह : आज वैवाहीक जिवनांत सामंजस्य राहील. घरात एखाद्या मंगल कार्याविषयी बोलणी होतील. आज तुम्हाला जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.  शुभ रंग : सोनेरी | अंक : ६ 

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  कन्या : आज तुम्हाला काही नकळत झालेल्या चुका निस्तराव्या लागतील. कुणाला शब्द देऊ नका कारण ते पाळता येणार नाहीत. अाज तुम्हाला जरा विश्रांतीची गरज भासेल. शुभ रंग : गुलाबी | अंक : २

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  तूळ : आज प्रकृती ठणठणीत असल्याने तम्हाला प्रत्येक कामात उत्साह जाणवेल. मुलांचे महागडे हट्ट पुरवताना मात्र नाकी नऊ येतील. मनोेरंजनासाठी वेळ काढाल. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : कार्यक्षेत्रातील वाढत्या कामाचा शीण जाणवेल.नोकरदारांचा ऑफिसला दांडी मारायचा मूड असण्याची शक्यता आहे. आज काही सज्जनांचा सहवास लाभेल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  धनू : जवळपासच्या प्रवासात काही नवे हितसंबंध जुळतील.शेजारी आपलेपणाने डोकावतील. मुलांंचे अती लाड थांबवणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळलेले बरे. शुभ रंग : भगवा | अंक : ७

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  मकर : कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेसा राहील. मोठे शौक जोपासता येतील. तरूणांना व्यसने आकर्षित करतील. आज मनावर संयम गरजेचा. कायद्याचे पालन करावे. शुभ रंग : आकाशी | अंक : ६

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  कुंभ : इतरांना न जमणारे काम करून दाखवण्याचा तुमचा हट्ट असेल. उच्च राहणीमानाकडे कल राहील. झटपट लाभाचा मोहाने नुकसान होईल. सतर्क रहा.  शुभ रंग : राखाडी | अंक : ३

 • aajache rashibhavishya Thursday 10 January 2018 Daily horoscope in Marathi

  मीन : आज बराच वेळ घराबोर जाईल. एखाद्या महत्वाच्या कामासाठी बरीच वणवण करावी लागेल. काही जणांचा गूढशास्त्रांच्या अभ्यासाकडे ओढा राहील. व्यस्त दिवस. शुभ रंग : मोतिया | अंक : २ 

Trending