आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 10 ऑक्टोबरला शतभिषा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. गुरुवारच्या या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : लाल | अंक : १   
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य. 

वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ५ 
नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.


कर्क :  शुभ रंग : मोतिया | अंक
: ४
आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.  

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ३
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.  

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ७
आवक पुरेशी असेल. अधुनिक राहणीमानाची आवड जाेपासाल. उच्चशिक्षण घेणाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.     

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ५ 
कौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईचे मन दुखाऊ नका.


धनू :  शुभ रंग : हिरवा| अंक
: ८
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. 

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ९
काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.   

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. 

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५ 
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.    

बातम्या आणखी आहेत...