आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

गुरुवार 12 डिसेंबर रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ८

कार्यक्षेत्रात प्रगतीरथ वेगवान राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मोठया खरेदीचे बेत  आखाल.

 • वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

आज अत्यंत आनंदी व उत्साही दिवस आहे. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय अचूक ठरतील. काही  दीर्घकाळ रखडलेली कामेही पूर्ण होतील. 

 • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे आहे. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. अती स्पष्ट स्वभावामुळे काही नाती दूरावतील. कमीच बोला.

 • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

व्यवसायात उत्तम आर्थिक लाभ होतील. आलेल्या सुसंधींचा सकारात्मकतेने वापर कराल. आज काही गरजू मित्रांच्या कामी याल. परोपकार कराल. 

 • सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

उद्योग धंद्यातील मंदीने नैराश्य येईल. नोकरदारांनी कामाच्या ठीकाणी सतर्कता बाळगावी. हितशत्रू आज मित्रांमधेच लपले असण्याची शक्यता आहे. 

 • कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ४

आज काही मन हळवे करणारे प्रसंग घडतील. वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. अध्यात्मिक विषयात गोडी निर्माण होईल.

 • तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : २

आज कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटनांनी नैराश्य येईल. कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नाही. आज  फक्त आपल्याच ताटात बघा. परोपकार नकोत. 

 • वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ५

कोणतेही महत्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालणार नाहीत. वैवाहीक जिवनांत काही लाडीक रुसवे फुगवे रहातीलच. तरुणांनी प्रेम डोळसपणे करावे.                                

 • धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ७

मनोबल कमी असून नकारात्मक मन:स्थिती असेल. कार्यक्षेत्रात अनुभवींचे सल्ले डावलू नका. स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील.

 • मकर : शुभ रंग : मरून | अंक : ८

आज प्रिय मित्रांचा सहवासात दिवस व्यतीत कराल. गृहीणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुले अभ्यासा व्यतिरीक्त सर्व काही करणार आहेत.

 • कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटल्याने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. कलेच्या क्षेत्रात असाल तर स्पर्धा अटळ आहे.

 • मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

कामानिमित्त आज बराच वेळ घराबाहेर रहावे लागेल.मित्र अपेक्षित सहकार्य करतील. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागेल. 

बातम्या आणखी आहेत...