Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Feb 14, 2019, 12:00 AM IST

आजचे राशिफळ : आज एक शुभ आणि एक अशुभ योग, 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास तर इतर राशीच्या लोकांनी राहावे सावध

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  गुरुवार, 14 फेब्रुवारीला एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. रोहिणी नक्षत्रामुळे दिवसाची सुरुवात ऐंद्र नावाच्या शुभ योगाने होत असून हा योग सकाळी 9 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर वौधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रह-स्थितीचा 12 पैकी 6 राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : सर्वच दृष्टीने अनुकूल असलेला दिवस सत्कारणी लावा. आज मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.विरोधकही आज तुमच्या विचारांनी प्रभावीत होतील. शुभ रंग : राखाडी | अंक : ८

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : आज तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीचे निर्णय घ्याल. एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. आज फक्त स्वार्थ साधून घेणे हिताचे.  शुभ रंग : क्रिम | अंक : ६ 

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : दैनंदीत कामात अडचणींचा सामना करावा लागेल. आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. शुभ रंग : जांभळा | अंक : ९

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी  खर्च कराल. अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. काही भाग्यवान मंडळी आज नव्या घराचा ताबा घेतील.  शुभ रंग : पिस्ता | अंक : १

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : आवक चांगली असल्याने तुमचे मनोबल उत्तम असेल. उद्योग व्यवसायात चढाओढीचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. नोकरीत उच्चपदस्थांचा पाठींबा राहील.   शुभ रंग : लाल | अंक : २

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. सरकार दरबारी रखडलेल्या कामांसाठी वशिला लावावा लागेल.  शुभ रंग : मरून| अंक : ४

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : आज जोखमीची कामे टाळायला हवीत. मित्रमंडळी चुकीचे सल्ले देतील. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल. मृगजळाच्या मागे लागण्यात वेळ दवडू नका. शुभ रंग : हिरवा | अंक : ५

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज जास्तीत जास्त वेळ घालवाल. उच्चपदस्थ मंडळींच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. शुभ रंग : स्ट्रॉबेरी  | अंक : ४

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : बेरोरगारांच्या भटकंतीस यश येईल. दुकानदारांची उधारी वसूल होईल. वादविवादात आपली मते इतरांवर लादू शकाल. शारीरीक थकवा जाणवेल. शुभ रंग : डाळींबी | अंक : ९

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. प्रिय व्यक्तीस दिलेली वचने पाळावी लागतील. शुभ रंग : भगवा | अंक : ७

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दूरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील. शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

 • Thursday 14 Feb 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल. शुभ रंग : पांढरा | अंक : ६

Trending