Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

दिव्य मराठी | Update - Mar 14, 2019, 12:00 AM IST

गुरुवारचे राशीफळ : आजचा दिवस 12 पैकी या 8 राशीच्या लोकांसाठी राहील खास, जुळून येत आहे एक शुभ योग, इतर चार राशीच्या लोकां

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  गुरुवार 14 मार्च रोजी मृग नक्षत्रामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकासांठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. विविध कामामध्ये दिवस फायदा करून देणारा राहील. या व्यतिरिक्त चार राशीचे लोक तणावात राहतील. व्यर्थ खर्च होण्याची शक्यता आहे. या 4 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : आनंदी व उत्साही दिवस. खिशात पैसा खेळता राहील.काही नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीवर मात्र लगाम असणे अत्यंत गरजेचे राहील. शेजारी वाद शक्य.  शुभ रंग : निळा| अंक : ९

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : स्वभावातील लहरीपणास आवर घालून संयमाने वागणे गरजेचे आहे. स्पर्धकांवर मात करण्यासाठी अविश्रांत परिश्रम  अवश्यक  आहेत. जोडीदार समजूतीने घेईल. शुभ रंग : क्रिम| अंक : ९

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : सार्वजनिक कामे करणाऱ्यांना लोकप्रियता मिळेल. योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे यशाकडे तुमची वाटचाल चालू राहील. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : मित्रमंळींचे सहकार्य मोलाचे राहील. काही प्रलोभने आकर्षित करतील. मोठया उलाढाली यशस्वी  होतील. मनाजोगत्या घटना घडल्याने मानसिक प्रसन्नता राहील.  शुभ रंग : मोतिया | अंक : २ 

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : कार्यक्षेत्रात वरीष्ठंवर तसेच सहकारी वर्गावर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आज भावनांच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. मित्रांना दूर ठेवा. शुभ रंग : राखाडी | अंक : १

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : बेकायदेशीर कृत्यातून त्रास संभवतो. नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत रहा. नोकरीधंद्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही.  शुभ रंग : अबोली | अंक : २

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : जे चालंलंय ते बरं चालंलंय. मोहापसून दूूर रहा.प्रतिष्ठेस  जपणे  गरजेचे  आहे. वाहन  सुरक्षित  चालवा. विवाह  जुळवण्या  विषयी  बोलणी उद्यावर ढकला.  शुभ रंग : हिरवा| अंक : ५

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : वैवाहीक जिवनांत आनंद द्विगुणीत करणारी घटना घडेल. नवे  स्नेहसंबंध जुळतील. नाती  जपण्यासाठी खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील. शुभ रंग : पांढरा | अंक : ४

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : वैवाहीक जिवनांत काही  क्षुल्लक स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे राहील. जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक करू नका. शुभ रंग : जांभळा | अंक : ३

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : व्यवसायात काही नव्या संधी चालून येतील. एखादा नव्या विषयात गोडी निर्माण होईल. गृहीणी साैंदर्याची तसेच फिटनेस ची काळजी घेतील. उत्साही दिवस. शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : परिवारात काही आनंदी घटनांनी खेळीमेळीचे वातावरण राहील. अनेक दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावणे  तुमच्या  हाती आहे. खेळाडूंनी सराव वाढवावा.  शुभ रंग : नारिंगी | अंक : ८

 • thursday 14 March 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : लेखन, पुस्तक प्रकाशन तसेच जाहिरातीच्या क्षेत्रात अनुकूलता राहील. साहित्यिक, कवी यांना वाचकवर्ग मिळेल. कोणतेही गैरव्यवहार मात्र टाळायला हवेत.  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

Trending