आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा गुरुवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी दिवसाची सुरुवात शुभ मुहूर्तामध्ये होत आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे. सोबतच, कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्रांच्या प्रभावाने एक शुभ योग जुळून येत आहे. यामुळे आजचा दिवस 12 पैकी 7 राशींसाठी चांगला राहील. काहींच्या घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. तर काहींना निवांत किंवा एकांत हवा-हावासा वाटेल. काही नोकरी करणाऱ्यांना आज अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कामाचे कौतुकही होईल. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल.

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ७
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहिक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ६
स्वभावातील अहंकारामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवलीत तर अनेक क्लिष्ट कामेही सोपी होतील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील. 


कर्क :  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक
: ३
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील. .                                                                     

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : २
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्य निष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ४
घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी  मानसिक  स्वास्थ्य बिघडवतील. आज एकांत हवासा वाटेल.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : १
मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही  जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

मकर : शुभ रंग : पिवळा| अंक : ४
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. आज प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने  आत्मविश्वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग अटळ आहेत. आज नव्या ओळखी होतील.

बातम्या आणखी आहेत...