Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार 

रिलिजन डेस्क | Update - May 02, 2019, 12:00 AM IST

गुरुवारचे राशिफळ : अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, कामात लागणार नाही मन, या 7 राशींचे लोक होऊ शकतात डिस्टर्ब...जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  गुरुवार, 2 मे रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक - उगीच वाद घालण्यापेक्षा आज संयम व मधुर वाणीने विरोधकांना जिंकता येईल. आज काही भाग्यवान मंडळींना नवीन घराचा ताबा मिळू शकेल. शुभ रंग : सफेद, अंक-७.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन - आप्तस्वकीयांसह आजचा दिवस अत्यंत मौजमजेत व्यतीत कराल.आर्थिक आघाडीवर सर्वकाही ठिकठाक राहील. मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल. शुभ रंग : मोतिया, अंक-३.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  मेष - आज अनेक सुसंधी तुमचे दार ठोठावतील. आवक ठिकठाक राहील. काही प्रमाणात तत्वांशी तडजोड मात्र करावीच लागणार आहे. आनंदी दिवस.  शुभ रंग : निळा, अंक-४.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  तूळ - मोठया लोकांच्या ओळखी स्वार्थ साधून घेण्यासाठी कामी येतील. कुसंगतीने धनहानी संभवते. उधारी उसनवारीचे व्यवहार आज टाळलेले बरे. शुभ रंग : आकाशी, अंक-३.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  कर्क - काही सुखद समाचार येतील सकाळपासूनच तुमचा मूड एकदम प्रसन्न असेल. आज घरात एखादी मौल्यवान खरेदी कराल. गृहसौख्याचा दिवस. शुभ रंग :पिवळा, अंक-९.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  कन्या - उद्योग व्यवसायात धनाची वृध्दी होईल. खिसा गरम असल्याने मित्रमंडळींत तुमच्या शब्दाला मान राहील. प्रवासात काही हितसंबंध जुळतील. शुभ रंग :  मोरपंखी, अंक-8.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ - एखादी मनाविरुध्द घटना घडल्याने चिडचिड होईल. प्रलोभने गोत्यात आणतील. जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील. आज कोणतीही रिस्क घेऊ नका. शुभ रंग : क्रिम, अंक-3.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  मकर - सकारात्मक दृष्टीकोन  ठेवाल तर हाती घेतलेले उपक्रम हमखास यशस्वी होतील. अधिकाराचा वापर याेग्य वेळी कराल. जोडीदाराशी सूर जुळतील. शुभ रंग : जांभळा, अंक-६. 

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  सिंह - चांगल्या घटनांनी मनाची उमेद वाढेल. परदेशवारीची स्वप्ने पहात असाल तर त्यादृष्टीने अनुकून घटना घडतील. उच्चशिक्षणार्थींच्या महत्वाकांक्षा वाढतील. शुभ रंग: डाळिंबी, अंक-५.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ - आज फक्त आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट राहील. आज जोडीदाराचा सल्ला मात्र डावलू नका. पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. शुभ रंग : भगवा, अंक-१.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  धनू - नोकरदारांच्या कामगिरीस वरीष्ठ दाद देतील. अधिकारी वर्गाने आपल्या कर्तव्यासही प्राधान्य देणे गरजेचे. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की आहे. शुभ रंग: मोतिया, अंक-2.

 • thursday 2 may 2019 daily horoscope in Marathi

  मीन - दिवस थोडासा विरोधी राहील. काही प्रमाणात वरीष्ठांशी मतभेद संभवतात. वाढत्या जबाबदारीचा ताण येईल. सुरक्षिततेस महत्व देणे गरजेचे. शुभ रंग : हिरवा, अंक-९. 

Trending