आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. विरोधकांना व स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. धाडसाची कामे टाळा.
आज व्यवसायातील आर्थिक उलाढाली भागिदारांना विश्वासात घेऊनच करा. वैवाहीक जिवनांत गोडवा असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.
नोकरीच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला जाणवेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. तरूणांनी कुसंगत टाळावी. व्यसने घात करतील.
आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील.हौसमौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्रमै़त्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.
बराच काळ रखडलेल्या घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावेच लागणार आहे. वाहन खरेदीची कामे मार्गी लागतील.
आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. बराच वेळ घराबाहेरच जाईल. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा. वादविवाद टाळावेत.
उद्योग व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल, नवे हितसंबंध तयार होतील. इतरांना दिलेले शब्द पाळू शकाल. प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी घ्या.
आज केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. मागून नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा. आज तुमची तब्येत जरा नरमच राहील.
कंजूषपणा बाजूला ठेऊन आज काही अवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील, सतर्क रहा. मित्रांना पार्टी आज नको.
आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येणार आहेत.
आज रिकामटेकडया गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल.
काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. घरातल्या थोर मंडळींचेही उपदेश ऐकून बोअर व्हाल. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.