Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 04, 2019, 12:00 AM IST

गुरुवार राशिफळ : 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझने

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  4 एप्रिल 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी उत्तरभाद्रपदा नक्षत्र ब्रह्मा नावाचा योग तयार करत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच. बेरोजगार असाल तर घरापासून लांब जायची तयारी असूद्या. अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. दगदग होईल. शुभ रंग : भगवा | अंक : ६

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. शुभ रंग : मरून | अंक : ८

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल.योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्रांवर अजिबात विसंबून राहू नका. शुभ रंग : पिस्ता | अंक : ७

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर उद्याचा दिवस योग्य राहील. शासकिय कामातही काही कारणाने विलंब होईल. अधिकरांचाही गैरवापर टाळायला हवा. शुभ रंग : क्रिम | अंक : ४

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. कष्टांचाही अतिरेक टाळा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणेही गरजेचे आहे. विश्रांतीही महत्वाची. शुभ रंग : गुलाबी | अंक : ५ 

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील. शुभ रंग :मोरपंखी | अंक : ९

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : आज आराेग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. रुग्णांनी पथ्यपाणी पाळावे अन्यथा आजार बळावेल. देण्याघेण्याचे व्यवहार रोख ठेवा. शुभ रंग : मोतिया | अंक : ३

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही.  शुभ रंग : पांढरा | अंक : १

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : आज स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत. खेळाडूंनी सराव वाढवणे गरजेचे आहे.  शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : कौटुंबिक सदस्यांची नाराजी दूर करावी लागेल. आज जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार टाळलेले बरे. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.  शुभ रंग : केशरी  | अंक : ३

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : जमेची बाजू भक्कम असेल. वादविवादात आज आपली बाजू परखडपणे मांडू शकाल. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आलेख चढता राहील. मनासारखी चैनही करता येईल. शुभ रंग : पांढरा  | अंक : ८

 • Thursday 4 April 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : व्यावसायिकांना आज वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. जाहीराती वर ही भर द्यावा लागणार आहे. आज विश्रांती नाही.  शुभ रंग : हिरवा  | अंक : १

Trending