आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

गुरुवार, 5 डिसेंबरला 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी पूर्व भाद्रपद नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त दुपारी 4 नंतर सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

 • मेष: शुभ रंग : निळा | अंक : २

अनावश्यक खर्चात कपात करून बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी काही मोठे खर्च उद्भवतील. अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे.

 • वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ९

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात अधिकारात वृध्दी होईल. संध्याकाळी करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. अनपेक्षित लाभ होईल. 

 • मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील.

 • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

काही मनाविरूध्द घटना घडतील. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. आज तुमचा देवधर्माकडे कल राहील. विश्रांतीची गरज भासेल. 

 • सिंह : शुभ रंग : माेरपंखी | अंक : ७

काही महत्वाची कामे असतील तर आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्यावीत. आज वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेफार मतभेद संभवतात.  शांत रहा. 

 • कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : ५

कोणतीही गोष्ट सहज साध्य होईल या भ्रमात राहू नका.ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी गोडीगुलाबी राहील.

 • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ८

नोकरी व्यवसायात आज उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. काही येणी वसूल होतील. प्रेमवीरांनी संध्याकाळी न भेटलेलेच बरे. 

 • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ९

आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.          

 • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. आज काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. वाद टाळलेले बरे.

 • मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २

पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. विद्यार्थ्याना अभ्यासाचे ओझे वाटेल.

 • कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ४

आज आर्थिक अडचण दुपारनंतर अकस्मिकरीत्या दूर होईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. आप्तस्वकीय तुमच्याशी जवळीक साधतील. 

 • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने  मनावर घेऊ नका. महत्वाच्या कामासाठी भ्रमंती होईल.