आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 07 नोव्हेंबर रोजी शतभिषा आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्रामुळे ध्रुव व व्याघात नावाचा एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. ध्रुव योग सकाळी 8:44 पर्यंत राहील. या शुभ योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. त्यानंतर व्याघात नावाचा अशुभ योग दिवसभर राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने वित्तहानी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. या शुभ/अशुभ योगाचा प्रभाव 12 पैकी 6 राशींच्या लोकांसाठी खास तर इतर राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील. 

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार... 

मेष: शुभ रंग : डाळिबी | अंक : १ 
व्यवसायात उत्तम आर्थिक लाभ होतील. आलेल्या सुसंधींचा सकारात्मकतेने वापर कराल. आज काही गरजू मित्रांच्या कामी याल. परोपकार कराल.   

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ६
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणार अहात. थोरांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. आज तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. 

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ९
उद्योग धंद्यातील मंदीने नैराश्य येईल. नोकरदारांनी कामाच्या ठीकाणी सतर्कता बाळगावी. हितशत्रू आज मित्रांमधेच लपले असण्याची शक्यता आहे.


कर्क :  शुभ रंग : पिस्ता | अंक
: ४
महत्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालणार नाहीत. वैवाहीक जिवनांत जे चालंलय ते बरं चाललंय. फार अपेक्षा नकांत. तरुणांनी प्रेम डोळसपणे करावे.  

सिंह : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
कार्यक्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय अचूक ठरतील. 

कन्या : शुभ रंग : तांबूस | अंक : १
आज कार्यक्षेत्रात अतिरीक्त जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज नक्की यश मिळेल. 

तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ४
आर्थिक बाजू भक्कम असल्याने मोठया खरेदीचे बेत  आखता येतील. गृहीणी आज घरसजावटीचे मनावर घेतील. मुले अभ्यासा व्यतिरीक्त सर्व काही करतील. 

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ७
आज तुम्ही सर्वप्रथम कर्तव्यास प्राधान्य द्याल. काही घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. आईच्या प्रकृतीची विचारपूस करा.  प्रिय मित्रांचा सहवास लाभणार आहे      


धनू :  शुभ रंग : मोतिया | अंक
: ९
मनोबल कमी असून नकारात्मक मन:स्थिती असेल. वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजून बोअर करतील. आज दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील.  

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६ 
असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे आहे. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. अती स्पष्ट स्वभावामुळे काही नाती दूरावतील. कमीच बोला.

कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ५ 
आज अत्यंत आनंदी व उत्साही दिवस अाहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटल्याने दीर्घकाळ रखडलेली कामेही पूर्ण होतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.    

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
कार्यक्षेत्रात अनुभवींचे सल्ले डावलू नका. आपली  मते इतरांस पटणार नाहीत. मित्र अपेक्षित सहकार्य करतील. कर्ज हप्ते फेडावे लागतील. झटपट लाभाचा मोह टाळा. 

बातम्या आणखी आहेत...