आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 9 जानेवारी 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी मृग नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. आजच्या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

  • मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ८

एखादा पत्ता शोधण्यास वणवण होईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

  • वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३

काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

  • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

तरुणांनी उध्दटपणास लगाम घालणे गरजेचे. मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. आहे. आवक पुरेशी असली तरी आज बचतीस  प्राधान्य देणे  गरजेचे राहील.  

  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २

आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

  • सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य. 

  • कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

  • तूळ: शुभ रंग : निळा | अंक : ३

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या. 

  • धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ६

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील. 

  • मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ८

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

  • कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उच्चशिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.  

  • मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ९

कौटुंबिक जिवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईचे मन दुखाऊ नका.

बातम्या आणखी आहेत...