आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात टिकत नसेल पैसा तर गुरुवारी करा हे उपाय, होऊ शकतो धनवर्षाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात अनेक लोक आर्थिक तंगीने त्रस्त आहेत. फक्त गरिबांनाच आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते असे नाही. अनेक कुटुंबांमध्ये चांगले उत्पन्न होत असूनही पैशांशी संबंधित अडचणी राहतात. अशा घरामध्ये पैसा येतो परंतु टिकत नाही. कधीकधी इच्छा नसतानाही व्यक्तीला सेव्हिंगही खर्च करावी लागते. तुम्हालाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला पिठाचा एक चमत्कारी उपाय अवश्य करावा. या उपायांनी तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊ शकतात. हे उपाय अत्यंत सोपे आहेत. तुम्हाला लवकर शुभफळ प्राप्तीची इच्छा असल्यास एखाद्या शुभ मुहूर्तावर हा उपाय करू शकता.


गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद मिसळून गुरुवारीही हे पीठ गायीला खाऊ घालावे. यामुळे घराची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन लवकरच धानाचे आगमन होऊ शकते. घरामध्ये पैसा टिकत नसेल तर हा दोषही दूर होईल. या व्यतिरिक्त दररोज मुंग्यांना खाण्यासाठी पीठ टाकावे.


शनिवारी पिठाच्या गिरणीत दळण टाकण्यापूर्वी त्यामध्ये 100 ग्रॅम काळे हरभरे, 100 ग्रॅम तुळस, 2 केशराच्या काड्या टाकाव्यात. या पिठाचे जेवण घरातील सर्व सदस्यांनी करावे आणि शक्यतो शनिवारीच याप्रकारे पीठ दळून आणावे. या उपायाने लवकरच आर्थिक तंगी दूर होऊ शकते. या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वाद असल्यास तेही दूर होऊ शकतात. घरात आनंदी वातावरण राहते.

बातम्या आणखी आहेत...