आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासावर चालतो तिबेटी बाजार, आयडीवर कोट्यवधींच्या मिळतात वस्तू, ग्राहकांची वस्तू विसरल्यास मिळण्याची खात्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/लुधियाना : हिवाळा सुरू झाला आहे. भारतातील मध्यम वर्गांची माफक दरातील उबदार कपडे घेण्यासाठी शहरातील तिबेटी मार्केटकडे पावले वळत आहेत. देशातील सुमारे २०० शहरांत २३५ तिबेटी सेंटर्सवर चार हजारांहून अधिक दुकाने या बाजारांत लागलेली असतात. सर्वत्र २५ ते ३० हजार तिबेटी काम करत असतात. विशेष म्हणजे या अस्थायी दुकानातून चालणारा संपूर्ण व्यापार विश्वासावर चालतो. धर्मशाला येथून मिळालेल्या ओळखपत्रावर तिबेटी समाजातील व्यापाऱ्यांना लुधियानातील लाला बिनव्याजी कोट्यवधींच्या वस्तू उधारींवर देतात. तिबेटी व्यापारी एवढाच एक विश्वास लुधियानातील लालांकडे असतो. कारण हा तिबेटी व्यापारी हंगाम संपताच आधी लालांची उधारी फेडतो. नंतर घरी जातो. विश्वासाची ही परंपरा गेल्या ५२ वर्षांपासून सुरू आहे. यात फसवणूक झाल्याच्या तक्रारी नाहीत. लुधियानातील ऑल इंडिया तिबेटियन रेफ्युजी ट्रेडर असोसिएशनचे सचिव जिगमित अॅडोन यांनी सांगितले, तिबेटी लुधियानातील व्यापाऱ्यांना लाला असे म्हणतो. त्यांच्यामुळेच आमची दुकानदारी चालते. १९५० च्या दशकात दलाई लामा अरुणाचलहून मसुरीला आले. तेव्हा त्यांच्यासोबत अनेक निर्वासित होते. वास्तव्यासाठी त्यांनी थंड हवेचे ठिकाण निवडले. परंतु उष्ण प्रदेशातील वातावरण त्यांना मानवले नाही. त्यामुळे तिबेटींसाठी केंद्र सरकारने सेंट्रल स्कूल फॉर तिबेटियन ही पहिली शाळा सुरू केली. १९६५-७० दरम्यान काही लाेकांनी लुधियानातील लालांकडून उधारीत कपडे घेऊन उबदार कपड्यांचा व्यापार सुरू केला. दिल्लीतील लाल किल्ला भागात फेरीवाले होऊन कपडे विकण्यास त्यांनी सुरुवात केली. हिवाळा संपताच ते लालांची उधारी फेडली आणि घरी परतले. देशात सर्वप्रथम १९६७ मध्ये लाल किल्ल्याजवळ उबदार कपड्यांचे तिबेटियन मार्केट सुरू झाले. लुधियानाचे लाला के. एन. कपूर यांनी सांगितले, आमचे १८ ते २० कारखाने आहेत. फेब्रुवारी महिन्यात आमचे पैसे बँकेत अथवा रोखींने जमा होते. तो व्यवहार कायम आहे.

ग्राहकांशी भांडल्यास लागू शकतो दंड


दररोज असोसिएशनचे लोक दुकानदारांच्या दुकानांची तपासणी स्वत: करतात. एखाद्या ग्राहकांची वस्तू इथे विसरून राहिली आहे काय, हेही पाहतात. तसेच ग्राहकांशी दुकादाराने वाद घातल्यास दुकानदारालाच दंड ठोठावला जातो. हा दंड असोसिएशन स्वत: वसूल करते. जर ग्राहक काही सामान विसरून गेला असेल तर तो पुन्हा येऊन सामान नेतो.