आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tibetan Mastiff Is Most Expensive Dog In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबब... विमानापेक्षाही महाग आहे हा डॉगी, जाणुन घ्या याची विशेषता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. आपण नेहमीच बघतो की, अनेक लोकांना कुत्रे पाळण्याचा शौक असतो. अनेक कुत्र्यांची किंमत हजारांमध्ये असते तर काहींची लाखांमध्येही असते. पण एखादा कुत्रा विमानापेक्षाही जास्त किंमतीत खरेदी करण्यात आला असे तुम्ही ऐकले आहे का? पण हे सत्य आहे. एका डॉगची किंमत 15 ते 30 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या किंमतीत एखादे छोटे विमान खरेदी केले जाऊ शकते. 

 

- राजस्थानची राजधानी जयपुरच्या दशहरा मैदानात एका डॉग शोचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील 40 ब्रीडच्या 200 पेक्षा जास्त कुत्र्यांनी सहभाग घेतला होता. पण सर्वांच्या नजरा तिबेटियन मस्टीफ ब्रीडच्या डॉगवर खिळल्या होत्या. 

 

- या ब्रीडची इंटरनॅशनल मार्केटमध्ये 15 ते 30 कोटी किंमत आहे. 30 कोटींमध्ये एखादे लहानसे विमान खरेदी केले जाऊ शकते. या शोमध्ये आलेला हा कोट्यावधींचा कुत्रा तिबेटियन मस्टीफ दिल्ली येथून आला होता. 

 

- चीनमध्ये लिलाव करुन हा कुत्रा खरेदी केला जातो. या तिबेटियन मस्टीफची किंमत जेवढी महाग आहे, तेवढेच महाग याला सांभाळणे आहे. याला 24 तास एसीमध्ये ठेवावे लागते. यासोबतच 15 दिवसांतून स्पा करुन आणावे लागते. 

 

- याचे जेवण जर्मनीमधून आणि बदाम ईरानमधून मागवले जातात. याची साइज 32 इंच असते आणि वजन जवळपास 70-80 किलो असते.