आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ticket Confirmation, Still No Seats On Air, Prevented More Than 3,000 Passengers From Boarding In 6 Months

तिकीट कन्फर्म, तरीही विमानात आसन नाही, ६ महिन्यांत २१ हजारांहून जास्त प्रवाशांना विमानात जाण्यापासून रोखले, एअर इंडिया सर्वात पुढे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर घोष 

नवी दिल्ली - दिल्लीतील आर्किटेक्ट सुधा चौधरी १७ जुलै रोजी एअर इंडियाचे विमान एआय ८०३ च्या कन्फर्म तिकिटासह सकाळी ६.१० वाजता विमान पकडण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना रोखण्यात आले. विमानात प्रवासी संख्या पूर्ण झाल्याचे कारण देत पुढील विमानातून पाठवू,असे त्यांना सांगण्यात आले. गेल्या ६ महिन्यांत ऐनवेळी २१,६९३ प्रवाशांना कन्फर्म तिकीट असतानाही विमानात चढू देण्यात आले नाही. या फसवणुकीमागे विमान कंपन्यांची लालूच हे कारण आहे.
 

सर्व विमान कंपन्यांत रोज १२० अतिरिक्त प्रवासी बुकिंग, मात्र तक्रारही केली जात नाही
 

> कारण : जास्त बुकिंग करणे
वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी यामागे अतिरिक्त बुकिंग हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. प्रत्येक एअरलाइन्सकडे नियमित प्रवाशांचा आकडा आहे. यातून सरासरी किती प्रवासी, याचा अंदाज बांधतात. याच आधारे अतिरिक्त बुकिंग होते.
 

नियम: प्रवाशांसाठी पर्याय
दुसऱ्या विमानात तिकीट बुक करण्याच्या पर्यायासह तिकीट रद्द करून पूर्ण रक्कम एअरलाइन्सकडून परत मागू शकता.
 

भरपाई देण्यात एअर इंडिया पुढे
भरपाई देण्यात एअर इंडिया सर्वात पुढे आहे. एअर इंडियाने जानेवारी-जून २०१९ ५.४७ कोटी, जेट एअरवेजने २.६४ कोटी भरपाई दिली आहे. 
 

जाणून घ्या आपले अधिकार
पर्यायी फ्लाइटची सोय १ तासाच्या आत केली गेला तर प्रवासी कोणत्याही परिस्थितीत भरपाईचा दावेदार ठरत नाही. याहून अधिक विलंब झाला तर मात्र प्रवाशास भरपाई मिळवण्यास पूर्ण हक्क असेल. पर्यायी फ्लाइट २४ तासांत उपलब्ध करून दिली तर एका बाजूच्या मूळ भाड्याच्या २०० टक्के आणि एअरलाइनचे इंधन शुल्क जोडून द्यावे लागेल. ही भरपाई जास्तीत जास्त १० हजार रुपये असेल. पर्यायी विमानाची सोय २४ तासांनंतर केली गेली तर एका बाजूच्या भाड्याच्या ४०० टक्के आणि इंधन शुल्क जोडून प्रवाशास भरपाई द्यावी लागेल.