आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरने स्वीकारले - ‘शाळेत असताना मला श्रद्धा आवडायची’, हैराण अभिनेत्री म्हणाली - ‘मला महित नव्हते’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : श्रद्धा कपूरचा चाहता असलेल्या को-एक्टर्समध्ये आणखी एका सुपरस्टारचे नाव जोडले गेले आहे. आता टायगर श्रॉफने एका मीडिया इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला आहे की, जेव्हा ते शाळेत होते, तेव्हा श्रद्धा त्याला खूप आवडायची. टायगरने पुढे सांगितले की, आम्ही एकाच शाळेत होतो, त्यावेळी माझा श्रद्धावर क्रश होता, पण मी तिला माझ्या या फीलिंगबद्दल कधीच सांगितले नाही, कारण मी घाबरायचो. 

टाइगरच्या मनातील ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा श्रद्धाला विचारले गेले की, तिला कधी टायगरवर क्रश होता का ?

यावर टायगर मध्येच थांबवत म्हणाला, ‘तिला क्रश नव्हता, तर हे प्रकरण उलट होते. शाळेत असताना मला ती खूप आवडायची.’ टायगरचे हे बोलणे ऐकून तर श्रद्धा सरप्राइज्ड झाली. तिचे उत्तर होते, ‘मला हे माहित नव्हते. जर माहित असते तर मी नक्कीच याप्रकरणी काहीतरी केले असते.’

जेव्हा त्याला विचारले गेले की, त्याने श्रद्धाला आपल्या या फीलिंगबद्दल का नाही सांगितले, तर टायगरने खूप मजेशीर उत्तर दिले. म्हणाला, यार मला भीती वाटायची. फक्त दुरूनच पाहायचो आणि आणि हे पाहणे क्रीपी वेमध्ये नव्हते, फक्त पाहात राहायचो. जेव्हा ती शाळेच्या आवारातून चालायची तेव्हा तिचे केस हवेमध्ये उडायचे.  

टायगरच्या या भावनांचे वर्णन ऐकून श्रद्धाला हसू आवरले नाही. उल्लेखनीय आहे की, टायगर श्रॉफपूर्वी वरुण धवननेदेखील खुलासा केला होता की, त्यालाही श्रद्धा आवडायची. त्याने तर एका टीव्ही शोदरम्यान आपल्या मनातील ही गोष्ट सांगून श्रद्धाला रोमँटिक स्टाईलमध्ये गुलाबाचे फुलंदेखील दिले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...