आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाच्या हल्ल्यात तीन इसम जखमी, बिनाखी शिवारातील थरारक घटना; नागरीक भयभीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फटाके फोडून गावकऱ्यांनी वाघाला पळवून लावले

भंडारा- येथील बिनाखी शिवारात वाघाने हल्ला केत्यामुळे 3 व्यक्ती जखमी झाले आहेत. गावात वाघ असल्याची माहिती मिळताच नागरिक एका ठिकाणी गोळा झाले होते. या दरम्यान वाघाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओत वाघ एका व्यक्तीच्या अंगावर बसलेला दिसत आहे, दरम्यान इतर लोकांनी वाघाला पळून लावल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर वनक्षेत्रातील गोंडेखारी गावात वाघ असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभाकाचे एख पथक वाघाला पकडण्यासाठी आले. गावातील एका शेतात वाघ लपला होता. या दरम्यान गावातील नागरिक जमा झाले. यादरम्यान वाघाने येथील नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात छोटेलाल ठाकरे (रा. गोंदेखारी), शंकरलाल तुरकर (रा. मिरगपूर, मध्यप्रदेश) आणि विजय शहारे (रा. शिंदपुरी) असे तिघे जखमी झाले आहेत.

तुमसर वनपरिक्षेत्रातील बिनाखी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाने दहशत पसरविली आहे. मागील आठवड्यात गोंदेखारीत एक इसम जखमी झाल्याची घटना घडली होती. या वाघाला वनविभागाच्या पथकाने जंगलात पळवून लावले होते. मात्र, शनिवारला सकाळी हा वाघ पुन्हा बिनाखी परिसरात नागरिकांना दिसला. याची कल्पना वन विभागाला देऊन नागरिकांनी वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चवताळलेल्या वाघाने नागरिकांवर प्रतिहल्ला चढवला. यात वाघाला पिटाळून लावण्याच्या प्रयत्नात तिघे जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तीनपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर वन अधिकाऱ्यांनी वाघाला जंगलात पळवून लावले असले तरी गावातील नागरिक भयभीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...