आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : देशात २९६७ वाघ, चार वर्षांत त्यांची संख्या ७४१ ने वाढली, मध्य प्रदेशात सर्वाधिक २१८ने वाढ तर छत्तीसगडमध्ये संख्या ४६ वरून झाली १९

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - जागतिक व्याघ्र दिनानिमित्त सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, देशातील वाघांची संख्या २९६७ पर्यंत पोहोचली आहे. २०१४ च्या तुलनेत या वेळी ७४१ वाघ वाढले आहेत. एकूण संख्येत ३३ % वाढ झाली आहे. अशा रीतीने देशाने वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य चार वर्षे आधीच पूर्ण केले आहे. अहवालानुसार सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशात वाढले आहेत. येथे २०१४ मध्ये ३०८ वाघ होते, ते वाढून ५२६ झाले आहेत. ५२४ वाघांसह कर्नाटक दुसऱ्या तर ४४२ वाघांसह उत्तराखंड तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रातही वाघांची संख्या १९० ने वाढून ३१२ झाली आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मात्र वाघांची संख्या घटली आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने मागील वर्षी देशातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि वन परिक्षेत्रात २८ निकषांवर वाघांची गणना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वी सेंट पीट्सबर्ग संमेलनात २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. वाघांसाठी सरकार अनेक पायाभूत सुविधा वाढवत आहे. पंतप्रधानांनी दोन चित्रपटांचा उल्लेख करत म्हटले की, ही गोष्ट “एक था टायगर’ पासून सुरू होऊन “टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचली आहे. ती येथे संपायला नको. कधी चित्रपटवाले गायचे बागों मे बहार है, आता गातील बाघों मे बहार है.

 

११ राज्यांत वाघांची संख्या वाढली, ३ राज्यांत घटली

१२ वर्षांत असे वाढले वाघ 
 वर्ष    संख्या 
 2018    2,967
 2014    2,226
 2010    1,706
 2006    1,411

 

छत्तीसगड, ओडिशा व आंध्र प्रदेशात घटली
राज्य           2014     2018
मध्य प्रदेश    308    526
कर्नाटक        406    524
महाराष्ट्र       190    312
राजस्थान       45    69
छत्तीसगड     46    19 
आंध्र प्रदेश      68    48 

बातम्या आणखी आहेत...