आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6 Bollywood Couples Attend Deepika Ranveer Reception:Tiger Shroff Disha Patani To Arjun Kapoor Malaika Arora And Arbaaz Khan Georgia To Varun Dhawan Natasha Dalal Reception

टायगर-दिशापासून ते अर्जुन-मलायकापर्यंत, दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते हे बॉलिवूडचे 6 लव्ह बर्ड्स, पार्टीतून गायब होते 20 मोठे स्टार्स, एका कपलला करण्यात आले नव्हते आमंत्रित : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी शनिवारी बॉलिवूड स्टार्ससाठी मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे एका शानदार रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. रिसेप्शनमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मान्यवर नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. या पार्टीत काही कपल्स लाइमलाइटमध्ये राहिले. ब-याच काळापासून एकमेकांना डेट करणारे 6 कपल्स टायगर श्रॉफ-दिशा पाटनी ,  अर्जुन कपूर-मलायका अरोरा, वरुण धवन-नताशा, अरबाज खान-जॉर्जिया, राजकुमार राव-पत्रलेखा आणि फरहान अख्तर-शिबानी दांडेकर दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. सर्वाधिक चर्चा या लव्ह बर्डच्या एन्ट्रीने एकवटली. फरहान अख्तर सिंगर आणि गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरच्या हातात हात घालून रिसेप्शन स्थळी दाखल झाला. तर अर्जुन आणि मलायका हे दोघेही एकत्र नव्हे तर ठरवून डिस्टन्स मेंटेन करताना दिसले.  टायगर श्रॉफ-दिशा पाटनी आणि वरुण धवन-नताशा दलाल पार्टीत व्हाइट अँड ब्लॅक मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले. याशिवाय अरबाज खानसुद्धा त्याची सध्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत तर राजकुमार राव गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत मीडियाला पोज देताना दिसले.


दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीतून गायब होते हे 20 मोठे स्टार्स...
- दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत एकीकडे कतरिना कैफ जुने शत्रुत्व विसरुन सहभागी झाली होती. कतरिनामुळेच रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचे सहा वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्यामुळे कतरिना आणि दीपिका यांच्यात बराच काळ कॅट फाइट रंगली होती. दोघीही जणी एकमेकींसोबत बोलणे किंवा एकमेकींना बघणे टाळत होत्या. पण आता पार्टीतील कतरिनाच्या उपस्थितीमुळे दोघींमध्ये आलबेल असल्याचे दिसून आले आहे.


- दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचे 20 मोठे स्टार्स दिसले नाहीत. दीपिकाचा पुर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड आलिया भट पार्टीत सहभागी झाले नव्हते.


- सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीर-आलिया सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे 20 तासांच्या शिफ्टमध्ये बिझी आहेत. त्यामुळे हे दोघे हे फंक्शन अटेंड करु शकले नाही. पण आलियाची आई सोनी राजदान या पार्टीत पोहोचल्या होत्या. तर रणबीर कपूरच्या कुटुंबातून कुणीही येथे दिसले नाही.


- याशिवाय अभिनत्री सोनम कपूरही पार्टीत दिसली नाही. पण तिचे वडील अनिल कपूर यावेळी उपस्थित होते. सोनमच्या लग्नात रणवीर कपूर प्रत्येक फंक्शनमध्ये सहभागी झाला होता. सोनम कपूर आणि रणवीर सिंह हे दोघे कजिन आहेत.


- सलमान खान, आमिर खान, शाहिद कपूर, युवराज सिंह (दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड), प्रियांका चोप्रा, कंगना रनोट, काजोल, अजय देवगण, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, परिणीती चोप्रा (रणवीरसोबत हिचे नाव जुळले होते), इरफान खान, अर्जुन रामपाल, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि इमरान खानसह अनेक जण या पार्टीत दिसले नाहीत.  


- सलमान काही खासगी कामामुळे रिसेप्शनमध्ये येऊ शकला नाही. तर त्याची धाकटी बहीण अर्पिता खान ही तिची बेस्ट फ्रेंड प्रियांकाच्या लग्नासाठी जोधपूरमध्ये आहे. त्यामुळे अरबाज खानने या पार्टीत खान कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व केले.


- असे म्हटले जाते की, सोनम कपूर आणि दीपिका पदुकोण यांचे फारसे जमत नाही. त्यामुळे सोनम त्यांच्या लग्नाच्या काळात फॉरेन ट्रीपला निघून गेली. याशिवाय कंगनासोबतही दीपिकाचे बोलणे नाही, त्यामुळे दीपिकाने तिला रिसेप्शनसाठी आमंत्रितच केले नाही.


- दुसरीकडे प्रियांका स्वतःच्या लग्नात बिझी आहे. तर परिणीती प्रियांकाची चुलत बहीण असून तीदेखील प्रियांकाच्या लग्नाच्या निमित्ताने जोधपूरमध्ये आहे. अभिनेता इरफान खान सध्या लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे.


रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स...
- दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले आकाश-अनंत, मुलगी ईशा, होणारी सून श्लोका आणि अनंतची कथित गर्लफ्रेंड राधिका मर्चंट सहभागी झाली होती. या पार्टीत मुकेश अंबानींच्या मातोश्री कोकिला बेन अनुपस्थित होत्या.


- बॉलिवूडमधून संजय दत्त-मान्यता दत्त, हेमा मालिनी, राणी मुखर्जी, अर्शद वारसी, अनिल कपूर, ऐश्वर्या राय, फराह खान, सचिन तेंडुलकर, कपिल शर्मा, जावेद अख्तर-शबाना आझमी, कल्कि कोचलिन, आर. माधवन, कपिल देव, जितेंद्र, तुषार कपूर, शत्रुघ्न सिन्हा-पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी सिन्हा, टायगर श्रॉफ-गर्लफ्रेंड दिशा पाटनी, सारा अली खान, जाह्नवी कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, खुशी कपूर, अंशुला कपूर, ईशान खट्टर दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...