आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर-हृतिकच्या चित्रपटाच्या सेटवरील 'अतिरेक्यांनी' पसरवली दहशत, पोलिसांनी दाखल केली तक्रार  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टायगर श्राॅफ आणि हृतिक रोशन स्टारर अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी घडलेल्या एका घटनेने सेटवरील सर्वांचे लक्ष वेधले. झाले असे की, वसाई क्षेत्रात लावण्यात आलेल्या या चित्रपटाच्या सेटजवळ शहरी भाग आहे. या भागात दशतवाद्यांच्या पोशाखात दोन लोकांना फिरताना लोकांनी पाहिले. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. काहींनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी यासाठी एक स्पेशल ऑपरेशन चालवले. त्यानंतर पाेलिसांनी सेटवर येऊन त्या दोन लोकांना पकडले. नंतर ते चित्रपटातील कलाकार असल्याचे कळाले. तरीदेखील पोलिसांनी प्रकरण दाखल केले. 

 

खरे तर या नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग वसईमध्ये सुरू होते. या चित्रपटासाठी भव्य सेट उभारण्यात आला आहे. शूटिंगसाठी सर्व टीम सेटवर आली होती. सर्व कलाकारांना गेटअपमध्ये येण्याचे सांगितले होते. यातच काही जुनियर आर्टिस्ट, जे दहशतवाद्यांच्या गेटअपमध्ये होते ते शूटिंगमधून ब्रेक घेऊन सेटच्या बाहेर पडले आणि शहरी भागातील एका दुकाना सिगारेट विकत घेण्यासाठी गेले. ते सर्वत्र फिरत होते. त्यांचा पोशाख पाहून लोकांना भीती वाटली कारण त्यांचा पोशाख मानवी बॉम्ब सारखा होता. बुलेट्सने भरलेली स्ट्रिप त्यांच्या कमरेला लागलेली होती. त्या वेळी एका एटीएम गार्डला शहरात दहशतवादी घुसल्याचे वाटले. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी धावपळ सुरू केली. 

 

पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन राबवून पकडले, शांतता भग करण्याचा गुन्हा दाखल...  

1 चित्रपटातील दोन एक्स्ट्रा कलाकार अतिरेक्याच्या पोशाखात शहरात फिरले आणि एका दुकारावरून सिगारेट विकत घेतले. ते पाहून एका एटीएम गार्डने पोलिसांना कळवले. 

 

2 सूचना मिळताचप पोलिसांनी सात ठाण्यांना अलर्ट केले. सीसीटीव्हीच्या मदतीने व्हॅन शोधली आणि त्या दोघांना पकडले.

 

3 जुनियर आर्टिस्ट्सकडून चूक झाल्याचे प्रॉडक्शन युनिटने पोलिसांना समजावले तरीदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 

यांच्यावर गुन्हा दाखल...  
बलराम गिनवाला(23) 
अरबाज खान, (20) 
हिमालय पाटील लोकेशन को-ऑर्डिनेटर (27) 
दत्ताराम लाड, युनिट इंचार्ज 

 

संशयाची कारणे...  
- एकाने काळ्या रंगाचा पठाणी सलवार कमीज आणि दुसऱ्याने मिलिटरी प्रिंटचा टीशर्ट घातला होता. 
- दोघांची दाढी वाढलेली होती. अफगाणी साफा घातला होता. 
- मल्टी युटिलिटी वेस्ट घातलेले होते. 
- कमरेवर कार्टिरेज बेल्ट लावण्यात आला होता. 
- व्हॅनचा वापर केल्यामुळे पोलिसांना मोठ्या हल्ल्याची संशय आला होता. 

 

...अन् उडाली खळबळ 
या भागात अतिरेकी आल्याची माहिती मिळताच पोलिस सावध झाले. अनेक ठाण्यात आणि कंट्रोल रूमला याची माहिती देण्यात आली. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सात ठाण्याची टीम बाहेर पडली. एक तास शोध माेहीम चालली. माणिकपूर पोलिस स्टेशनवरून आलेले सीनियर पोलिस इन्स्पेक्टर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या टीमने जवळपासच्या भागाची झडती घेतली. सीसीटीव्हीच्या मदतीने त्या व्हॅनचा नंबर पाहिला ज्यात ते बसले होते. त्यांची माहिती काढल्यावर कळाले की दोघे अतिरेकी नव्हे, तर यशराज फिल्म्सच्या सेटवरील कलाकार होते. ते अतिरेक्याच्या पोशाखात शूटिंग करत होते. त्यांचे नाव बलराम गिनवाला (23) आणि अरबाज खान (20) असे आहेत. 

 

कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल...  
प्रॉडक्शन युनिटच्या प्रमुखाने पोलिसांना ते चित्रपटाच्या सेटवरील दोन एक्स्ट्रा कलाकार असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांनी शूटिंगच्या परवानगीचे सर्व कागदजपत्र दाखवले, तरीदेखील युनिट इन्चार्ज आणि त्या दोघांवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण करणे आणि शांतता भंग करण्याचा आरोप लावला आहे. 

 

वसईजवळ आहे अरबी समुद्र...  
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. कारण या परिसरात वसई खाडी अरबी समुद्राजवळ आहे. या भागात आधीही घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. मुंबई शहरात झालेल्या ९/११ हल्ल्यानंतर समुद्री मार्गाच्या जवळपास कोणत्याही संदिग्ध घटना दिसल्यानंतर ती सूचना खूपच गांभीर्याने घेतली जाते. 

बातम्या आणखी आहेत...