• Home
  • Gossip
  • Tiger said, 'Mother's movie' boom 'flops, then home furniture was also sold, sleeping on the ground'

Bollywood / टायगर म्हणाला, 'आईचा चित्रपट 'बूम' फ्लॉप झाला तर घरातील फर्नीचरदेखील विकले गेले होते, जमिनीवर झोपावे लागायचे' 

'बूम' सोबतचा एक्सपेरिमेंट टायगरच्या पालकांना पडला होता महाग

दिव्य मराठी वेब

Sep 05,2019 11:00:57 AM IST

बॉलिवूड डेस्क : टायगर श्रॉफचे म्हणणे आहे की, त्याची आई आयेशा यांच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट 'बूम' फ्लॉप झाल्यानंतर कुटुंब मोठ्या आर्थिक चणचणीतून गेले. परिस्थिती अशी होती की, त्याच्या घरातील फर्नीचरदेखील विकले गेले होते. टायगर एका मॅगझिनच्या दिलेल्या मुलाखतीत अपयश आणि कुटुंबावर ओढवलेल्या त्या संकटाविषयी बोलत होता.

जमिनीवर झोपणे सर्वात वाईट अनुभव होता : टायगर
टायगर म्हणतो, "मला आठवते कसे एकानंतर एक आमचे फर्नीचर विकले गेले होते. ज्या गोष्टी पाहात मी मोठा होत होतो, त्या गायब होत होत्या. मग माझा बेडदेखील विकल्या गेला. मी जमिनीवर झोपायला सुरुवात केली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता." टायगरने सांगितल्याप्रमाणे जेव्हा कुटुंब वाईट आर्थिक परिस्थितीतून जात होते तेव्हा तो केवळ 11 वर्षांचा होता.

'बूम' सोबतचा एक्सपेरिमेंट पडला महाग...
टायगरने सांगितल्याप्रमाणे त्याच्या पॅरेंट्सने 'बूम' सोबत जो एक्सपेरिमेंट केला होता, तो त्यांना माहित पडला. 2003 मध्ये रिलीज झालेला 'बूम' कैजाद गुस्तादने दिग्दर्शित केला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर, जॅकी श्रॉफ, जीनत अमान आणि जावेद जाफरी यांच्यासारखे प्रसिद्ध चेहरे होते. कतरिना कैफचा हा डेब्यू चित्रपट होता. सांगितले जाते की, चित्रपट रिलीजपूर्वीच लीक झाला होता. त्यामुळेच तो फ्लॉप ठरला.

'वॉर' मध्ये दिसणार आहे टायगर...
टायगरने 2014 मध्ये कृति सेननसोबत चित्रपट 'हीरोपंती' ने बॉलिवूड डेब्यू केला होता, जो बॉक्सऑफिसवर हिट ठरला. त्याचा आगामी चित्रपट 'वॉर' 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे, ज्यामध्ये तो पहिल्यांदा ऋतिक रोशनसोबत दिसणार आहे.

X
COMMENT