आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff 30th Birthday Today ,Actor Shares Special Memories Related To This Occasion

30 वर्षांचा झाला टायगर श्रॉफ, म्हणाला - वाढदिवशी वडिलांनी दिलेली खास भेट आजही डोक्याच्या शेजारी ठेवून झोपतो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता टायगर श्रॉफ 30 वर्षांचा झाला आहे. 2 मार्च 1990 रोजी मुंबई येथे जॅकी श्रॉफ आणि आयशा श्रॉफ यांचा घरी जन्मलेल्या टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. वाढदिवसानिमित्त दिव्यमराठीशी खास संभाषणात त्यांनी त्यासंबंधित खास आठवणी सांगितल्या.
 

  • प्रश्न: टायगर, तू तुझा वाढदिवस कसा साजरा करणार आहे?

उत्तरः गेल्या 4 वर्षांपासून मी माझ्या वाढदिवशी कामात व्यस्त आहे. मला माझ्या वाढदिवशी काम करणे आवडते, म्हणून मी या दिवशी वर्किंग असतो. 

  • प्रश्नः तुझे वडील जॅकी श्रॉफ यांनी तुझ्या वाढदिवशी दिलेली संस्मरणीय भेट कुठली?

उत्तरः पापा नेहमी भेट म्हणून मला एक रोपटे देतात. कधी तुळशीचे रोपटे तर कधी स्पायडर प्लांट. ते नेहमीच असे ग्रीन गिफ्ट देतात. स्पायडर प्लांट रात्री ऑक्सिजन तयार करते, म्हणूनच त्याच्या वैशिष्ट्यामुळे मी माझ्या वडिलांनी दिलेले हे रोपटे डोक्या शेजारी ठेऊन  झोपी जातो. ते मला नेहमीच ताजी हवा देते.

  • प्रश्नः बालपणी हा खास दिवस कसा सेलिब्रेट करायचा?

उत्तरः माझा वाढदिवस सामान्य मुलांप्रमाणे साजरा करण्यात आला. ब-याच मुलांना घरी बोलवून माझा वाढदिवस साजरा केला जायचा. या वाढदिवसाच्या मेजवानीत अनेक खेळांचे आयोजनही करण्यात  यायचे. पण या सगळ्यात विशेष आकर्षण म्हणजे डान्स कॉम्पिटिशन असायची. ज्यामध्ये माझी सध्याची सहकलाकार श्रद्धा कपूरसुद्धा सहभागी व्हायची. चित्रपट कुटुंबातील एक भाग असल्याने आम्ही बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. श्रद्धा कपूर एक उत्तम डान्सर आहे, म्हणून ती माझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नृत्य स्पर्धा जिंकत असे.

  • प्रश्नः त्यावेळी तू कसा डान्स करायचा?

उत्तरः त्याकाळी माझा डान्स एवढा परफेक्ट नव्हता. श्रद्धा कपूरने मला माझ्या आयुष्यातील पहिले नृत्य शिकवले. मला आठवते की त्या वेळी श्रद्धाने मला हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील ‘एक पल का जीना’ या अतिशय गाण्यावर नृत्य करायला शिकवले होते. आज तिच्याबरोबर काम करण्यात मला खूप आनंद झाला आहे.